russia- ukraine crisis : अमरावती : युक्रेन येथून स्नेहा माघारी येताच पालकांचे डोळे पाणावले

russia- ukraine crisis : अमरावती : युक्रेन येथून स्नेहा माघारी येताच पालकांचे डोळे पाणावले
Published on
Updated on

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : रशिया आणि युक्रेन (russia- ukraine crisis) या दोन देशात सुरू असलेल्या युद्धात अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले. यात युक्रेन देशातील खार्कीव शहरात आपला प्राण मुठीत घेऊन वैद्यकीय शिक्षण घेत असलेली स्नेहा भीमराव लांडगे ही वरूड येथील विद्यार्थिनी सुखरूप घरी पोहोचली. नागपूर विमानतळावर पोहोचताच आई वडिलांनी कडकडून मिठी मारून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

माजी सैनिक भीमराव लांडगे यांची २० वर्षीय कन्या स्नेहाला वैद्यकीय शिक्षणासाठी भारतात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ती युक्रेनला आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेली होती. रशिया व युक्रेन युद्धाच्या वेळेस खार्कीव शहरात आपला जीव मुठीत धरून तिला काही दिवस काढण्याची वेळ आली. युक्रेनमधील (russia- ukraine crisis) भारतीय दूतावासाने कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे स्वत:च काही भारतीय विद्यार्थ्यांच्या सोबतीने ट्रेनने प्रवास करीत पोलंड या देशाच्या सीमेजवळ पोहचली. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी पोलंड येथून २२९ विद्यार्थ्यांना मायदेशी पाठवले.

स्नेहाने सांगितली आपबिती

विदेश मंत्री जनरल वी. के. सिंग यांचे अत्यंत सहकार्य युक्रेनमधील भारतीयांना मिळत असल्याचे तिने आवर्जून सांगितले. आपल्या सैनिक मित्राची मुलगी सुखरूप परत येत असल्याने जरुड येथील सरपंच, माजी सैनिक सुधाकर मानकर, अरुण हरले आणि स्नेहाचे आई-वडील नागपूर विमानतळावर पोहचले. आपली मुलगी सुखरूप दिसताच सर्वांचे डोळे आनंदाने पाणावले.

शिक्षण प्रणालीत करावा बदल

भारतीय शिक्षण प्रणालीत बदल करण्याची गरज स्नेहाने व्यक्त केली. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी जर सरकारने बदल केले. तरच आपल्या देशातील विद्यार्थी हा परदेशात जाणारच नाही. तेव्हा सरकारने याबाबत गांभिर्याने विचार करावा, असेही स्नेहा म्हटले आहे.

हेही वाचलंत का ?  

पहा व्हिडिओ 

कसे झाले रशियाचं विघटन ? सांगतायत परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक रोहन चौधरी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news