

वाशिम; पुढारी वृत्तसेवा: समृद्धी महामार्गावर ट्रक आणि आराम बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या पर्पल कंपनीच्या खासगी बसने धावत्या ट्रकला मागून धडक दिली. ही घटना समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील कारंजाजवळ आज (दि.२४) पहाटे घडली.
भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने धावत्या ट्रकला मागून जबर धडक दिल्याने बसमधील वरच्या बर्थवर झोपेत असलेले प्रवासी खाली पडले. यात अनेक प्रवाशांचे हात- पाय फॅक्चर झाले. तर, बस चालक ट्रक आणि बसच्या केबिनमध्ये अडकला होता. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर बस चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमी प्रवाशांना कारंजा येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले आहे.
हेही वाचा