चंद्रपूर : माजी नगरसेवक दीपक जयस्‍वाल यांच्या कारला अपघात | पुढारी

चंद्रपूर : माजी नगरसेवक दीपक जयस्‍वाल यांच्या कारला अपघात

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा

नागपूर – चंद्रपूर मार्गावरील टेमुर्डा येथील पेट्रोलपंपा समोर महानगरपालिकेचे माजी नगसेवक दीपक जयस्वाल यांच्या कारला अपघात झाला. ते नागपूर वरून चंद्रपूरकडे जात होते. हा अपघात आज (दि. ३१) दुपारी दाेन वाजण्याच्या सुमारास घडला.

दीपक जयस्वाल हे कारने  नागपूर वरून चंद्रपूरकडे जात होते. टेमुर्डा येथील पेट्रोलपंपाजवळ समोरून अचानक टीप्पर आल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यावेळी कार रस्ता दुभाजकाला धडकून दुसऱ्या एका दुचाकीला धडकली. दीपक जयस्वाल यांना किरकाेळ दुखापत झाली. तर कारचालक उद्धव बन्सोड यांना डोक्याला दुखापत झाली आहे,

दुचाकीस्वार रमेश चंद्रभान जेणेकर रा . पिचदुरा हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वरोरा येथे हलविण्यात आले आहे. ही धडक एवढी जोरदार होती की, चंद्रपूरच्या दिशेने जाणाऱ्या कारने नागपूर मार्गावर वळण घेतले होते. त्यात जयस्वाल यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

Back to top button