Hingoli: सेनगाव नगरपंचायत निवडणुकीत मतदारांचा संमिश्र कौल | पुढारी

Hingoli: सेनगाव नगरपंचायत निवडणुकीत मतदारांचा संमिश्र कौल

सेनगाव ; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी समिश्र कौल दिला आहे.  राष्ट्रवादी , शिवसेना , भाजप या पक्षांना प्रत्‍येकी ५ प्रभागात विजय मिळाला. तर  काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, अटीतटीची निवडणूक  झालेल्या प्रभाग क्रंमाक पाचमध्ये राष्ट्रवादीने गड राखला आहे. विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतीषबाजी करत जल्लोष केला. (Hingoli)

सेनगाव नगरपंचायत निवडणुकीकडे शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. या ठिकाणी मागील पाच वर्षात भाजपने राष्ट्रवादी व सेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पहायला मिळाली होती. यावेळी मात्र मतदारांनी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीला संमिश्र कौल दिला आहे. बालेवाडी परिसरातून अपहरण झालेल्या डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा मिळाला सुखरूप !!

Hingoli : प्रभागनिहाय निकाल

 प्रभागनिहाय पक्ष, उमेदवार आणि कंसात मते

प्रभाग क्रमांक १ : राष्‍ट्रवादी : गायत्री देशमुख ( १४७ ),  शिवसेना : योगिता सोमाणी ( १२४ ),  भाजप :  अरुणा गट्टाणी ( ११० ),

प्रभाग क्रमांक २ :  शिवसेना: यमुनाबाई देशमुख ( २०१ ) भाजप : अनिता खाडे (१४३ ),

प्रभाग क्रमांक ३ : भाजप : अमोल तिडके ( २१७ ), शिवसेना : रेखाबाई देशमुख ( १९४ ),  काँग्रेस : आंबादास तिडके ( २ ), अपक्ष : गजानन देशमुख ( ९ ),

प्रभाग क्रमांक ४ : भाजप : अंजली देशमुख ( १२७ ) शिवसेना : जगन्नाथ देशमुख ( १०२ ), काँग्रेस : सीमा देशमुख ( ९३ )

प्रभाग क्रमांक ६ : राष्ट्रवादीच्या शालिनी देशमुख (१६२) , शिवसेना: वनिता महाजन ( १२०),  भाजप : सुमन गाढवे ( ७९)

प्रभाग क्रमांक 7 : भाजप : राधा देशमुख ( १२९ ) काँग्रेस :  तारामती देशमुख ( ७५)  शिवसेना : हर्षा अगस्ती ( ७३), अपक्ष सीमा उफाड ( ५६), अपक्ष अर्चना भवर ( ६)

प्रभाग क्रमांक 8 :  शिवसेना : शिलानंद वाकळे ( २३९), भाजप : संतोष मुडे (  ४७),  राष्ट्रवादी : सुरेश बहिरे (  १०) काँग्रेस : विष्णू खंदारे  ( ३ ),

प्रभाग क्रमांक 9 : शिवसेना : ज्योती देशमुख ( २६९ ),  भाजप :  गोविंदा विटकरे ( ९५),  काँग्रेस : गणेश जारे ( १७)

प्रभाग क्रमांक 10 : काँग्रेस : विमलबाई गाढवे यांना( १३८ ),  राष्ट्रवादी : कैलास देशमुख (१२२),  शिवसेना सुंदर खाडे ( ७९), भाजप : चंद्रकला लोखंडे ( ६९)

Hingoli : प्रभाग ११मध्ये

प्रभाग क्रमांक 11 : शिवसेना : शिलाबाई कोकाटे ( १४५ ), भाजप गजानन घोगरे ( ६२)

प्रभाग क्रमांक 12 : भाजप : मीरा खाडे( १७५) , काँग्रेसच्या मिनाक्षी शिंदे ( ६१),  शिवसेना उर्मिला खाडे ( ५७)

प्रभाग क्रमांक 13 :  राष्ट्रवादी : उषा मानकर ( १५७),  शिवसेना वनिता हनवते ( ८९), भाजप : वंदना सुतार ( २३)

प्रभाग क्रमांक 14 : काँग्रेस ओमप्रकाश देशमुख ( १६३) राष्ट्रवादी : उमेश देशमुख( १३२),  शिवसेना : पांडुरंग फटांगळे ( ९७)

प्रभाग क्रमांक 15 :  भाजप : प्रयागबाई फटांगळे ( २५३),काँग्रेस : प्रभूआप्पा जिरवनकर ( १८२)

प्रभाग क्रमांक 16 : राष्ट्रवादी : स्वाती बहिरे ( १०५), भाजप : शांता वानरे ( ७३),   शिवसेना वैशाली जुमडे ( ४९) काँग्रेस :  आशा वाघमारे (१४ )

प्रभाग क्रमांक 17 :  शिवसेना निखिल देशमुख : ( १९५),  भाजप : गोपाळराव देशमुख ( १५९),

 

Back to top button