अकोला : कारखाली उडी घेवून एसटी कर्मचा-याची आत्महत्या - पुढारी

अकोला : कारखाली उडी घेवून एसटी कर्मचा-याची आत्महत्या

अकोला, पुढारी वृत्तसेवा : एसटी संपामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या शहादा आगाराच्या चालकाने अकोला जिल्ह्यातील अकोट येथे धावत्या कारखाली उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. १६ जानेवारी) रोजी दुपारी घडली. अरविंद अनंत चव्हाण असे आत्महत्या केलेल्‍या चालकाचे नाव आहे.

मागील दोन महिन्यापासून एसटी संप सुरू आहे. चालक अरविंद चव्हाण हे संपात सहभागी झाल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यामुळे ते मानसिकदष्ट्या खचचे होते. बडतर्फ झाल्यानंतर ते आपल्या मुळगावी देवरी येथे राहण्यास गेले होते. येथेच त्यांनी धावत्या कारखाली उडी घेवून आत्महत्या केली.

या घटनेची आकस्मित मृत्यूची नोंद दहिहंडा (ता. अकोट) पोलिस स्टेशनमध्ये केली आहे. या घटनेनंतर अकोट आगारातील कर्मचा-यांनी शासनाविरोधात तीव्र निदर्शने करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button