चंद्रपूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने चाकूने भोसकून केली पत्नीची हत्या | पुढारी

चंद्रपूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने चाकूने भोसकून केली पत्नीची हत्या

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा

चारित्र्यावर संशय घेत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पतीने आपल्याच घरात पत्नी व मुलीला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला, तर मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना काल Z()(गुरुवार) भद्रावती तालुक्यातील कुचना येथे ब्लाक-१० मधील क्वार्टर नंबर-७७ मध्ये घडली. वीरेंद्र रामप्यारे साहानी (वय ४३ ) असे संशयीत आरोपी पतीचे नाव असून, माजरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

संशयीत आरोपी पती वीरेंद्र साहानी हा वेकोली माजरीच्या खुल्या खाणीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून, पत्नी सुमन (वय ३६) व एक मुलगी सिमरन (१७) मुलगा करण (१५) व आलोख (१३) यांच्यासह वेकोलिच्या कुचना कॉलनीत ब्लॉक-१० मधील क्वार्टर नंबर-७७ मध्ये राहत होता. काल गुरुवारी दुपारी पती पत्नी दोघांमध्ये प्रचंड भांडण झाले. भांडण एवढे विकोपाला गेले की, पतीने पत्नी सुमनच्या छातीवर व पोटात चाकूने सपासप पाच वार केले. तो ऐवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मूलगी सिमरन हिच्या पोटावर चाकुने वार करून रक्तबंबाळ केले. पत्नी व मुलगी या थरारक घटनेत रक्ताच्या थारोळ्यात पडली. घटनेनंतर त्याच अवस्थेत पत्नी व मुलीला सोडून आपल्या क्वार्टरच्या वरुन उडी मारून आरोपी पती तेथून पसार झाला.

दरम्यान जखमी अवस्थेत सुमन व मुलगी सिमरन ब्लॉक मधील तळमजल्यातील क्वार्टरच्या समोर येवून खाली पडली. दरम्यान शेजारच्या लोकांनी धाव घेऊन रक्तबंबाळ अवस्थेत बेशुध्द पडलेल्या सुमन व सिमरनला वेकोली माजरीच्या क्षेत्रीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना पत्नी सुमन हिचा मृत्यु झाला. दरम्यान मूलगी सिमरन गंभीर जखमी असल्याने तिला उपचाराकरिता वेकोलीच्या रुग्णालयातून चंद्रपुर येथील खाजगी  कुबेर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. सद्या सिमरनची प्रकृती धोक्या बाहेर असल्याची माहिती आहे. संशयीत आरोपी वीरेंद्र साहनी हे विसलोन गावाच्या रेल्वे मार्गाने  पसार होत असताना माजरी पोलिसांनी कुचना येथील काही युवकाच्या साहाय्याने पाठलाग करून त्याला पकडले.

या प्रकरणी आरोपी विरुद्ध ३०२, ३०७ कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आज शुक्रवारी संशयीत आरोपीला भद्रावतीच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आरोपीचा चंद्रपुरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विनीत घागे करीत आहेत.

Back to top button