वर्धा : पोलिस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने जाळून घेतले | पुढारी

वर्धा : पोलिस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने जाळून घेतले

वर्धा ; पुढारी वृत्तसेवा

पिपरी (मेघे) येथील पोलिस वसाहतीत राहणार्‍या पोलिस कर्मचार्‍याच्या निवासस्थानापुढे गृहरक्षक तरुणीने जाळून घेत आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गृहरक्षक तरुणी गंभीर जखमी झाली असून उपचारार्थ नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. काल ९ जानेवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचा प्रयत्नाचे कारण पुढे आले नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका गृहरक्षक तरुणीने नऊ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास पोलिस वसाहतीतील एका पोलिस कर्मचार्‍याच्या निवासस्थानापुढे जाळून घेतले. आरडाओरड होताच, धूर निघताना दिसल्याने स्थानिकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

या घटनेत तरुणी गंभीररीत्या भाजली असून तिला नागपूरच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी भेट दिली. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद पोलिसात झालेली नव्हती.

Back to top button