Tukaram Mundhe: दिवाळीत मिठाई खरेदी करताय? थांबा! तुकाराम मुंढेंनी दिला महत्त्वाचा इशारा; एक चूक ठरू शकते आरोग्यासाठी अत्यंत घातक

Tukaram Mundhe FDA Warning on Sweets and Khoya: मिठाई आणि खवा खरेदी करताना उत्पादनाची तारीख, वापरण्याची अंतिम मुदत आणि गुणवत्ता तपासण्याचे आवाहन FDA अधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
Tukaram Mundhe FDA Warning on Sweets and Khoya
Tukaram Mundhe FDA Warning on Sweets and KhoyaPudhari
Published on: 
Updated on: 

Tukaram Mundhe FDA Warning on Sweets and Khoya: दिवाळी आणि सणासुदीच्या काळात मिठाई, खवा तसेच इतर गोड पदार्थांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, मिठाई खरेदी करताना तिची गुणवत्ता, उत्पादनाची तारीख आणि वापरण्याची अंतिम मुदत तपासणे आवश्यक आहे. मुदत संपलेले किंवा मुदत संपण्याच्या जवळ आलेले पदार्थ खरेदी करू नका, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त  तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

मिठाई आणि खवा खरेदी करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. शक्यतो नामांकित दुकानांमधून तसेच योग्य लेबल असलेले पदार्थ खरेदी करावेत. पॅकबंद मिठाई किंवा खवा घेताना त्यावरील उत्पादनाची तारीख आणि वापरण्याची अंतिम मुदत तपासावी. मिठाईला अतिशय भडक रंग दिलेला असल्यास ती खरेदी करणे टाळावे. तसेच सोन्याचा किंवा चांदीचा वर्ख लावलेल्या मिठाईबाबतही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चांदीचा वर्ख खरा की बनावट, हे कसे ओळखाल?

मिठाईवर लावलेला चांदीचा वर्ख खरा आहे की त्याऐवजी अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करण्यात आला आहे, याचीही नागरिकांनी काळजी घ्यावी. चांदीचा वर्ख हातात घेऊन चोळल्यास तो विरघळून जातो, तर अॅल्युमिनियमचा वर्ख चोळल्यावर त्याची गोळी किंवा पातळ फॉइल तयार होतो. त्यामुळे मिठाईवरील वर्खाबाबतही सतर्क राहणे गरजेचे आहे.

गरजेपुरतीच मिठाई खरेदी करण्याचे आवाहन

नागरिकांनी आवश्यक असेल तेवढीच मिठाई खरेदी करावी. खरेदी केलेली मिठाई आणि खव्याचे पदार्थ शक्यतो दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवू नयेत. ते पदार्थ ताजे असतानाच वापरावेत. मिठाई किंवा खव्याच्या गुणवत्तेबाबत काही संशय आल्यास अथवा भेसळ आढळल्यास तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी. अशा तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

व्यापाऱ्यांनाही नियमांचे पालन करण्याचा इशारा

मिठाई विक्रेते आणि संबंधित व्यावसायिकांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. मुदत संपलेले किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्रीस ठेवू नयेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.