

ओतूर (पुणे) : पुढारी वृत्तसेवा : कल्याण – नगर महामार्गापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या खामुंडी ते बदगी घाटात दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
या परिसरात शुक्रवार (दि. ८) व शनिवारी (दि. ९) संततधार मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दगड-मातीचा ढिगारा घाट रस्त्यावर आल्यामुळे हा मार्ग पूर्ण बंद आला आहे. सद्यस्थितीत पर्यायी मार्ग म्हणून पिंपरी पेंढार-म्हसवंडी मार्गे वाहतूक वळविण्यात आली असून प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा