दुरुस्तीसाठी आंबेनळी घाट आज बंद

दुरुस्तीसाठी आंबेनळी घाट आज बंद

पोलादपूर : पुढारी वृत्तसेवा :  गतवर्षी झालेल्या जुलै मधील अतिवृष्टीमध्ये आंबेनळी घाटासह महाबळेेशर ते प्रतापगड पायथा या मार्गावरील काही रस्ते बाधित झाले होते. पोलादपूर सुरुर राज्य मार्गही बाधित झाला होता. या मार्गाचे काही काम गतीने करण्यात आले होते. तर उर्वरित काम व पावसाळी कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांच्यातर्फे 20 जून रोजी बंद ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी बुधवारी 22 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत पुन्हा सर्व वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवणार आहेत.

गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या  अतिवृष्टीमध्ये तालुक्याच्या अनेक रस्ते, पूल, घाट, शेती, घरे, जनावरे यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. रस्त्यांवर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतुकीसाठी रस्ते बंद झाले होते. मोठया प्रमाणावर दगड माती वृक्ष रस्त्यावर येऊन मोरी, पुल यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. रस्ता वाहुन जाणे, पूल वाहुन जाणे अशा प्रकारे देखिल मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. या सर्व ठिकाणी मोठया प्रमाणावर दुरूस्तीची कामे सुरू आहेत.

या कामांची काही दिवसांपूर्वी आ. मकरंद पाटील यांनी भेट देवुन पाहणी केली व आ. पाटील यांनी ही सर्व कामे पावसाळ्याआधी पूर्ण करण्याबाबतचे आदेश दिले होते. याबरोबरच पावसाळयात रस्ता बंद राहणार नाही याची खबरदारी घ्या अशा सूचना देखील सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाबळेेशर येथील उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांनी त्यादृष्टीने कामाचे नियोजन केले होते. प्रथम सोमवार 20 जुन रोजी महाबळेेशर पोलादपूर या रस्त्यावरील किल्ले प्रतापगड फाटा ते मेटतळे या दरम्यानचा घाटरस्ता व कुंभरोशी येथुन पारफाटा ते देवळी हा रस्ता असे दोन रस्ते दुरूस्तीच्या कामामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होते.

नियोजित कामे पूर्ण करण्यात आली आहेत मात्र, ही सर्व कामे एका दिवसात शक्य नसल्याने तसेच मंगळवारी महाबळेेशर येथे आठवडे बाजार भरत असल्याने घाटातील रस्ता सुरु ठेवण्यात आला होता, मात्र उर्वरित कामासाठी पुन्हा 22 जून रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत दुरूस्तीच्या कामासाठी आंबेनळी घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहीती सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाबळेेशर येथील उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news