ठाणे : २२२ वर्षे परंपरेच्या मुरबाड- म्हसा यात्रेला सुरुवात

खांब लिंगेश्वराची म्हसा यात्रा
खांब लिंगेश्वराची म्हसा यात्रा
Published on
Updated on

मुरबाड; बाळासाहेब भालेराव : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा गावी एक साधू आला होता त्याला एका लाकडी खांबात शिवलिंग असल्याचे दिसले, त्याने ग्रामस्थांना ही माहिती सांगितली. त्यानंतर ग्रामस्थांनी तेथे मंदिर बांधले. पुढे या नवसाला पावणाऱ्या देवस्थानाचे नाव खांब लिंगेश्वर असे प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र व आजूबाजूच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व जवळपास २२२ वर्षे परंपरा असलेल्या नवसाला पावणाऱ्या ऐतिहासिक खांब लिंगेश्वराची म्हसा यात्रा पौष पौर्णिमेपासून सुरू होत आहे.

यावर्षी ही यात्रा आज ६ जानेवारीपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर यंदा म्हसा यात्रेत तुफान गर्दी उसळणार असल्याचे मुरबाड प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच म्हसा यात्रेत शुक्रवार, शनिवार, रविवार, लागोपाठ दोन सुट्ट्या असल्याने यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणार हे निश्चित दिसून येत आहे. या म्हसा यात्रेत करमणुकीची अनेक साधने उपलब्ध असली तरी मुरबाडचा पारंपारिक नसावेत्रेत वेगळेच महत्व दिसून येत आहे मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या मुरबाड तालुक्याचे म्हसा हे उपनगर मानले जाणाऱ्या म्हसा गावातील प्राचीन महेश्वराच्या मंदिरात पौष पौर्णिमेपासून ही यात्रा ९ ते १० दिवस चालू राहणाऱ्या यात्रेला दर दिवशी लाखो फक्त भाविक येतात परंतु यंदा म्हसा थंडीचे मोठे सावट असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे घोंगडी व ब्लँकेट वस्तूची बाजारात गर्दी उसळणार असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. तर यात्रेत विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत त्यामध्ये मौतका कुवा, जॉईंट व्हिला घोंगडी बाजार, शेळी बाजार, विविध प्रकारचे वस्तूचे दुकाने यात्रेकरूंना पहावयास व खरेदीसाठी मिळतात.

सदरची म्हसा यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली असून, कोणताही अनुचित प्रकार घडून येण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे तर त्याचबरोबर आरोग्य सेवा ही सज्ज झाली आहे. म्हसा येथे यात्रा भरते याचे मुख्य कारण या परिसरातील सुमारे चोवीस गावे व पुणे आणि रायगड जिल्ह्याची सीमा अतिशय जवळ आहे यामुळे गुरांची व शेत मालाची वाहतूक त्याकाळी बैलगाडीने करणे सोयीचे होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news