ठाणे : यंदा सार्वजनिक गणेश मंडळाना होणार घरगुती दराने वीजपुरवठा

October Sankashti Chaturthi
October Sankashti Chaturthi

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहेच, परंतु यंदा गणेश मंडळांना घरगुती वीज ग्राहकांच्या दराने
वीजपुरवठा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य
अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.

31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर कालावधीत साजरा होणार्‍या गणेशोत्सवासाठी महावितरणकडून गणेश उत्सव मंडळांना घरगुती वीज दराने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. पहिल्या 100 युनिटसाठी केवळ 4 रुपये 71 पैसे प्रति युनिट, 101 ते 300 युनिटसाठी 8 रुपये 69 पैसे प्रति युनिट, 301 ते 500 प्रती युनिट वीज वापरासाठी 11 रुपये 72 पैसे प्रति युनिट दर आकारण्यात येणार आहे. 500
युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी 13 रुपये 21 पैसे दराने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी घेतली जात नाही घरगुती किंवा अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणतर्फे स्वस्त विजेचे पर्याय गणेश मंडळाना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. गणेश मंडळांनी अन अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम 2003 नुसार कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

गणेश मंडळांनी वीजपुरवठा घेतांना काय काळजी घ्यावी

  • पावसाची शक्यता असल्याने संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी
    घ्यावी.
  • मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करूनघ्यावी.
  •  गणेश उत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी.
  • मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा
    ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड द्यावा.
  •  गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news