ठाणे : मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

ठाणे : मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील नौपाडा बी कॅबिन येथील स्वाद हॉटेलजवळ इमारतीच्या कन्स्ट्रक्शनचे काम चालू होते. त्यावेळी मातीचा मोठा ढिगारा पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या ढिगाऱ्या खाली चार कामगार अडकले होते. त्यापैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला असून एक किरकोळ जखमी झाला आहे. तर एक जण सुखरूप आहे. जखमी कामगारांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

बी कॅबिन येथील सत्य नीलम या कन्स्ट्रक्शन साईटवर पाया खोदण्याचे काम सुरू होते. गुरुवारी हे काम सुरू असताना सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास मातीचा ढिगारा घसरल्याने तो पडला. हा ढिगारा काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडला. या ढिगाऱ्याखाली चार कामगार अडकले. होते. त्यापैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला. हबीब बाबू शेख (४२ वर्ष, मुंब्रा) व रणजित असे मयत व्यक्तींची नावे आहेत, तर निर्मल रामलाल राब (४९ वर्ष, मुंब्रा) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच एका कामगाराला सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आले आहे. जखमी कामगाराला ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news