

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याणमधील एका नोकरदाराची मोठ्या पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून दोघांनी ऑनलाईन माध्यमातून मुलाखत घेतली. मुलाखतीत उत्तीर्ण झाल्याने पदस्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि पाठविलेली एक लिंक उघडण्यास सांगून त्यामाध्यमातून नोकरदाराच्या वेगळ्या बँक खात्यांमधून एकूण 4 लाख 9 हजार 649 रुपये स्वत:च्या खात्यांवर वर्ग करुन फसवणूक केली आहे.
या संदर्भात कल्याण पश्चिमेकडील छत्री बंगल्याजवळ असलेल्या न्यू रिद्धीसिद्धी पार्कमध्ये राहणारे योगेश नारायण चेऊलकर (45) यांच्या
फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर या तक्रारदाराला चुना लावणार्यांची नावे विशाल शर्मा आणि कृष्णा रामाराव अशी आहेत.
जुलै 2021 दरम्यान फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 ते 27
जुलै 2021 या कालावधीत आरोपी विशाल शर्मा आणि कृष्णा रामाराव यांनी योगेश चेऊलकर यांना मोबाईलवरून संपर्क साधला. आम्ही जॉब्स लाईव्ह डॉट कॉममधून बोलतो आहोत, विविध कंपन्यांमध्ये असलेल्या नोकर्या व तेथील मुलाखतींची कामे आम्ही बाह्यस्त्रोत यंत्रणेतून करतो, असे योगशे यांना सांगितले. या बोलण्यावर योगेश यांनी विश्वास ठेवला.
योगेश यांना भामट्यांनी वरिष्ठ व्यवस्थापक पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखविले. या पदासाठी त्यांनी योगेश यांची कॉग्नीजन्ट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीच्या तिघा भामट्या अधिकार्यांमार्फत मुलाखत घेतली. या मुलाखतीत योगेश पास झाल्याचे सांगण्यात आले. या नोंदणी प्रक्रियेसाठी योगेश यांच्याकडून सुरूवातीला 6 हजार 500 रुपये बदमाश्यांनी उकळले.
त्यानंतर वरिष्ठ व्यवस्थापक पदाची पदस्थापना देण्यासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी करावी लागेल, अशी थाप मारून 18 हजार 900 रुपये उकळण्यात आले. त्यानंतर या बदमाश्यांनी एक लिंक त्यांच्या मोबाईलवर पाठविली होती