ठाणे : गर्भवती प्रेयसीची हत्या करणारा गजाआड

file photo
file photo
Published on
Updated on

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  गर्भवती प्रेयसीबरोबर झालेल्या वादानंतर तिची गळा चिरून हत्या करणार्‍या मारेकरी प्रियकरास मुंब्रा
पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत बेड्या ठोकत गजाआड केले. अल्तमश मुनोवर दळवी (कौसामुंब्रा) असे अटक करण्यात आलेल्या
व्यक्तीचे नाव आहे.

मुंब्रा येथील विराणी इस्टेट परिसरात एका अज्ञात महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी
5 वाजण्याच्या सुमारास समोर आली होती. सदर ठिकाणी एका महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी सर्वप्रथम मयत महिलेची ओळख शोधून काढली असता सदर मयत मुलीचे नाव मुस्कान उर्फ नादिया मजिद मुल्ला (22, कौसा, मुंब्रा) असल्याचे समोर आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मयत तरुणीचे
अल्तमश मुनोवर दळवी याच्यासोबतप्रेमसबंध असल्याचे समोर आले.

तसेच मयत तरुणी गर्भवती होती अशी देखील माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासात अल्तमश याचा शोध घेतला.
तो पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्यास मुंब्रा पोलिसांनी शनिवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानका बाहेरून अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news