घरी बोलावून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

file photo
file photo

भिवंडी : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील घुंगटनगर येथे राहणार्‍या अल्पवयीन मुलीचा एका तरुणाने घरी बोलावून विनयभंग केला. ही  धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून भिवंडी शहर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र विनयभंग करणारा तरुण फरार झाला आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेने भिवंडीतील केशरवाणी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तीन महिन्यांपूर्वी राणी नावाची मुलगी घुंगटनगर येथील गुलाम रसूल चाळ येथे राहायला आली.तिच्यासोबत तिचा भाऊ अमीरही राणीसोबत राहत होता. याच चाळीजवळ राहणार्‍या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची राणीसोबत ओळख झाली. त्यामुळे आमिरही तिच्याशी बोलू लागला. 16 जून रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास आमिरने तिला काही बहाण्याने आपल्या घरी बोलावले आणि घरात आल्यानंतर तिच्यासोबत अश्‍लील कृत्य केल्या. त्याचवेळी अल्पवयीन मुलीने आरडाओरड केल्याने तरुण घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलीने घडलेल्या प्रकाराचे आईला कथन केल्याने आईने शहर पोलिस ठाणे गाठून तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली आणि त्याचा मोबाईल, लॅपटॉप आणि मोटारसायकल जप्त केली आहे.या घटनेबाबत केसरवाणी समाजात प्रचंड नाराजी असल्याचे भिवंडी केशरवाणी समाजाचे सुजित गुप्ता यांनी सांगितले.त्याने सांगितले की, सुमारे चार वर्षांपूर्वी एका दिव्यांग मुलीवर अशाच प्रकारे सामूहिक बलात्कार झाला होता. मात्र त्यात सहभागी असलेल्या एकाही आरोपीला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news