उस्मानाबाद : कोजागरी पौर्णिमेसाठी तुळजापूर गजबजले

उस्मानाबाद : कोजागरी पौर्णिमेसाठी तुळजापूर गजबजले
Published on
Updated on

तुळजापूर;  संजय कुलकर्णी :  महाराष्ट्राची  कुलस्वामिनी तथा शक्ती देवता श्री तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर नगरीत कोजागिरी पौर्णिमेचा मुख्य सोहळा सोमवार (दि. 10) रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने राज्यासह परराज्यातून येणार्‍या भाविकांनी तुळजापूर गजबजले आहे. आज (दि. 9) दुपारी 3.42 वाजता कोजागिरी पौर्णिमेप्रारंभ होत असून उद्या (दि. 10) दुपारी 2.25 वाजता कोजागिरी पौर्णिमा समाप्त होत आहे. यंदा कोजागिरी पौर्णिमेचा दोन दिवस योग जुळून आल्याने भाविकांना मातेचे दर्शन सुलभ होणार असून मुख्य
उत्सवाचाही ताण मंदिर व पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी होणार आहे, हे यंदाच्या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्ये आहे.

दरम्यान, नवरात्रोत्सवकाळात लाखों भाविकांनी मातेला पावणे चार कोटी रुपयांचे दान दिल्याची माहिती मंदिर समितीच्या सूत्रांनी दिली. तुळजापुरात शनिवारी सायंकाळपासूनच भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरू झाला असून येत्या दोन दिवसात भाविकांची उच्चांकी गर्दी होणार
आहे. दोन वर्षाच्या खंडानंतर कोजागरी पौर्णिमा निर्बंधमुक्तपणे साजरी होत आहे. त्यामुळे भाविकांची गर्दी प्रचंड उसळणार
असल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news