Miraroad Crime News: मीरा रोडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; महिला दलाल अटक, 3 तरुणींची सुटका

या रॅकेटचे धागेदोरे मुंबई, ठाणे आणि वसई-विरारपर्यंत पसरले असल्याचे समोर आले आहे.
Miraroad Crime News
Miraroad Crime NewsPudhari Photo
Published on
Updated on

मिरा रोड: मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाऱ्या तरुणींना देहव्यापाराच्या दलदलीत ढकलणाऱ्या एका महिला एजंटला नयानगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन पीडित तरुणींची सुटका केली असून, या रॅकेटचे धागेदोरे मुंबई, ठाणे आणि वसई-विरारपर्यंत पसरले असल्याचे समोर आले आहे.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनूसार मीरा रोड येथील नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, एक महिला दलाल ऑर्केस्ट्रा बारमधील तरुणींचे फोटो ग्राहकांना पाठवून त्यांना देहव्यापारासाठी पुरवणार आहे.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नयानगर पोलिसांनी एक पथक तयार केले. पोलिसांनी पयाडे हॉटेल परिसरात बनावट ग्राहक आणि पंच पाठवून सापळा रचला. महिला दलाल तरुणींना घेऊन येताच पोलिसांनी झडप घालून तिला ताब्यात घेतले.

Miraroad Crime News
Fake Vitamin Supplement: मुदतबाह्य औषधे विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

तपासात निष्पन्न झाले की, अटक करण्यात आलेली महिला गेल्या दोन वर्षांपासून मुंबई, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसरात हे रॅकेट चालवत होती. ती मुंबईतील विविध ऑर्केस्ट्रा बार आणि डान्स क्लबमधील तरुणींचे फोटो ग्राहकांना पाठवून सौदेबाजी करत असे.

Miraroad Crime News
Kalyan Accident: कचरा गाडीच्या चाकाखाली बालकाला चिरडले कल्याण पूर्वेतील वसारच्या गायकर नगरमधील दुर्घटना

त्यानंतर लॉजिंग किंवा इतर ठिकाणी या तरुणींना पाठवले जात असे. या कारवाईत पोलिसांनी 3 पीडित तरुणींची सुटका केली असून त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. अटक केलेल्या महिला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news