Fake Vitamin Supplement: मुदतबाह्य औषधे विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

26 लाख 63 हजारांचा मुद्देमाल जप्त; अनेक दिवस होता प्रकार सुरू; गुन्हा दाखल
Fake Vitamin Supplement
Fake Vitamin Supplementpudhari
Published on
Updated on

डोंबिवली: ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि कालबाह्य झालेल्या व्हिटॅमिन सप्लिमेंट्सवर बनावट उत्पादन तारीख लावून बाजारात अर्थात दुकानात विक्री करणाऱ्या दोघा बदमाशांचा क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने पर्दाफाश केला आहे. महिनाभरातील क्राईम ब्रँचची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

या कारवाईत क्राईम ब्रँचने 26 लाख 63 हजार 509 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.अब्दुल करीम रईस खान (40, वर्ष, रा. मलंग चाळ, कचोरे रोड, पत्री पूल, डोंबिवली-पूर्व) आणि बिरबल रामदुलाहार यादव (43, रा. शिवाजी पॅलेस, देवजीनगर, नारपोली, भिवंडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Fake Vitamin Supplement
Kalyan Crime: कल्याण रेल्वेस्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला

एका कंपनीच्या नावाखाली कालबाह्य अर्थात एक्सपायरी झालेल्या उत्पादनांची विक्री सुरू असल्याची खबर खासगी गुप्तहेरांकडून सहाय्यक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती.

हा तर ग्राहकांच्या जीवावर बेतणारा प्रकार असल्याने गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी सपोनि सर्जेराव पाटील, सपोनि बळवंत भराडे, पोउपनि किरण भिसे, सपोउपनि दत्ताराम भोसले, सपोउपनि बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सुधीर कदम, विजय जिरे, सचिन भालेराव, गोरक्षनाथ पोटे, विलास कडू, सचिन कदम, आदिक जाधव, पांडुरंग भांगरे, उल्हास खंडारे, जयकर जाधव, प्रशांत वानखेडे, प्रविण किनरे, महाजन, गुरूनाथ जरग, सतीश सोनवणे, मिथून राठोड, विनोद चन्ने, गणेश हरणे, गोरक्ष शेकडे, जालिदंर साळुंके, मंगल गावित आणि सपोउपनि अमोल बोरकर या पथकाने गुरुवारी कल्याण पश्चिमेकडे जुना मच्छी बाजारात असलेल्या जुबेदा प्लाझातील हिना मिनी बाजार नामक दुकानावर छापा टाकला.

Fake Vitamin Supplement
Kalyan dangerous buildings: कल्याणमध्ये 470 इमारती धोकादायक

पोलिसांचे आवाहन

व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारी अर्थात धोकादायक उत्पादने बाजारात विक्रीस आणणाऱ्या दुकलीचा गोरख धंदा उद्ध्वस्त करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर आयुक्त

डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर वागडे यांनी कौतुक केले आहे. तर ग्राहकांनी कोणतेही खाद्यपूरक किंवा औषधी उत्पादन खरेदी करताना उत्पादनाची तारीख आणि एक्सपायरी डेट नीट तपासावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news