बदलापूर प्रकरणी संस्थाचालकासह मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करा : विजय वडेट्टीवार

बदलापूर पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली घटनेची माहिती
Vijay Vadattiwar News
विजय वडेट्टीवार Pudhari File Photo
Published on
Updated on

बदलापूर : बदलापूरमध्ये घडलेली घटना ही अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. याप्रकरणी मुख्याध्यापक, शिक्षिका, संस्थाचालक यांच्यावरही गुन्हे दाखल करावे. तसेच उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण हे गृहखात्याला चपराक आहे. नैतिकता, नीतिमत्ता थोडी जरी असेल तर न्यायालयाचे निरीक्षण पाहून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.२२) केली

Vijay Vadattiwar News
शाळांना सीसीटीव्ही बंधनकारक, बदलापूर घटनेनंतर सरकारचा निर्णय

वडेट्टीवार यांनी बदलापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिका-यांकडून घटनेची आज (दि.२२) माहिती घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी असलेल्या मुख्याध्यापक, शिक्षिका आणि संस्थाचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी केली आहे. शाळेत असं काही होऊ शकत नाही, ही घटना शाळाबाहेर झाली असेल किंवा सायकल चालवताना घडले असेल, असे शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेने पीडित मुलीच्या पालकांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांकडे जाऊ नका, असाही दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला. या संस्थेने पुरावे नष्ट केले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. तसेच सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत, असा सवालही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे गुन्हा लपवणारे देखील गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

Vijay Vadattiwar News
Badlapur School Case | बदलापूर शाळेतील CCTV डीव्हीआर पोलिसांच्या ताब्यात

पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, उज्ज्वल निकम हे फुलटाईम भाजप कार्यकर्ता आणि पार्ट टाईम वकील आहेत. ते भाजपाची बाजू मांडतील की, सत्याची बाजू मांडतील? असा प्रश्न पडतो. त्यामुळे याप्रकरणी आरोपीला वाचवायचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही, असा इशाराही वडेट्टीवार यांनी यावेळी दिला. तसेच उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण हे गृहखात्याला चपराक आहे. नैतिकता, नीतिमत्ता थोडी जरी असेल तर न्यायालयाचे निरीक्षण पाहून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, असे म्हणत वडट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news