दिवंगत अभिनेते जयंत सावरकर यांच्याविषयी जाणून घ्या 10 गोष्टी

दिवंगत अभिनेते जयंत सावरकर यांच्याविषयी जाणून घ्या 10 गोष्टी
Published on
Updated on

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : मराठी, हिंदी चित्रपट वेब सिरिज, नाटकात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते व 97 व्या मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जयंत सावरकर यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मला, मुलगा कौस्तुभ, सून, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

जयंत सावरकर यांच्याविषयी जाणून घ्या 10 गोष्टी

1. अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ रोजी गुहागरमध्ये झाला.

2. त्यांना 21 भावंडे होती. रोज सकाळी चार वाजता उठून चरकातून उसाचा हंडाभर रस काढायचा आणि तो चालत जावून विकायचा हा त्यांच्या कुटुंबियांचा दिनक्रम असायचा.

3. मोठे बंधू मुंबईत नोकरीस असल्याने जयंत सावरकर यांनीही मुंबई गाठली. ते गिरगावात राहू लागले आणि तेथेच नोकरी करू लागले.

4. नाटकाची आवड असल्याने जयंत सावरकर यांनी नोकरी सोडली आणि रंगमंच कामगार (बॅकस्टेज आर्टीस्ट) म्हणून काम केले. पुढील बारा वर्षे ते 'बॅक स्टेज आर्टिस्ट' म्हणून काम करत राहिले.

5. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले.

6. पहिल्यांदा त्यांना आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित 'किंग लिअर' (सम्राट सिंह) या नाटकात मा. दत्ताराम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी अनेक नाटकात अभिनयाचा ठसा उमठवला.

7. 100 हून आधिक मराठी नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या.

8. अपराध मीच केला, अपूर्णांक, अलीबाबा चाळीस चोर, अल्लादीन जादूचा दिवा, अवध्य, आम्ही जगतो, बेफाम, एकच प्याला, एक हट्टी मुलगी, ओ वुमनिया, कळलाव्या कांद्याची कहाणी, के दिल अभी भरा नहीं अशा अनेक नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

9. अलीकडेच त्यांनी आई कुठे काय करते या मालिकेत मामाची तर समांतर या वेबसिरिज मध्ये ज्योतिषाची भूमिका साकारली होती.

10. वयाच्या पंचाहत्तरीनंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली. अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या बॉलिवूड कलाकारांसोबतही त्यांनी कामे केली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news