संतापजनक! महिलेवर पती आणि दिराकडून अनैसर्गिक अत्याचार

डोंबिवली येथील ह्रदयद्रावक घटनेत सासू आणि भावजयही सहभागी
Unnatural torture by wife and husband
महिलेवर पती आणि दिराकडून अनैसर्गिक अत्याचार File Photo

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली जवळील गावामध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 32 वर्षीय महिलेवर तिच्या पतीने आणि त्याच्या लहान भावाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणात दोन भावंडासह पीडितेची सासू आणि भावजय यांचासुद्धा संबध आहे. कुटूंबातील त्रासाला कंटाळून पीडितेने कल्याणच्या महिला तक्रार निवारण केंद्रात या संदर्भात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी दोन्ही भावांसह पिडीतेच्या सासू आणि भावजयीच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Unnatural torture by wife and husband
Jalgaon Crime | धमकी देत शेतात महिलेवर अत्याचार, संशयिताला अटक

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडितेचे गतवर्षी उत्तर प्रदेशातील तरुणाशी लग्न झाले. मूळची उत्तर प्रदेशातील पिडीत तरूणी कल्याणमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती. लग्नानंतर पती तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार करू लागला. पिडीता त्याला विरोध करत होती. यानंतर तिच्या दिराने पिडीतेशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावू लागला. पिडीतेने त्याला प्रतिबंध केला. मात्र तरीही दिराने पिडीतेशी जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून हा नराधम पिडीतेवर अनैसर्गिक अत्याचार करत आहे. तसेच सासू आणि भावजय दोघीही पिडीतेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news