

Proposed Water Cut Withdrawn Ulhasnagar
उल्हासनगर : दिवाळीच्या सणात उल्हासनगरकरांना पाणी कपातीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. शहरात प्रस्तावित पाणी कपात दिवाळीनंतर लागू करावी आणि 36 टक्के प्रस्तावित कपात कमी करून 24 टक्के करावी, अशी मागणी महापौर ॲड. अश्विनी कमलेश निकम यांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. या मागणीला मंत्री सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असल्याने या काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी महापौरांनी दिवाळीच्या कालावधीत पाणी कपात लागू करू नये, अशी आग्रही विनंती केली होती. तसेच प्रस्तावित पाणी कपातीचे प्रमाण कमी करण्याची मागणीही त्यांनी केली.
महापौरांच्या मागणीला मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक मान्यता दिल्याने दिवाळीच्या सणात उल्हासनगरकरांना पाणी कपातीच्या संकटातून मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयासाठी महापौर ॲड. अश्विनी कमलेश निकम यांनी मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त केले.