Ulhasnagar Smart Parking- उल्हासनगर महापालिकेची स्मार्ट पार्किंग पण अवैध?

Ulhasnagar Smart Parking-53 वाहनांना 67 हजार 500 रुपयांचा दंड; वाहनचालकांनी व्यक्त केला रोष
Ulhasnagar Smart Parking
Ulhasnagar Smart Parking
Published on
Updated on

उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या पालिकेच्या स्मार्ट पार्किंग मधील अवैध पार्किंगविरोधात महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 53 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये पाच चारचाकी वाहनांचाही समावेश होता. या कारवाईत एकूण 67 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र, या कारवाईनंतर वाहन मालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 3 च्या वतीने रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या हातगाड्या आणि स्टॉल हटवून अतिक्रमण दूर केले. त्याचब-रोबर रेल्वे स्थानकाबाहेर सुरू असलेल्या अवैध पार्किंगविरोधातही विशेष मोहीम राबविण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर दंड आकारण्यात आला. विशेष म्हणजे ही वाहने पालिकेने सफेद पट्टे मारून स्मार्ट पार्किंग केलेल्या ठिकाणी उभी करण्यात आली होती. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी स्मार्ट पार्किंगच्या नावावर ही पार्किंग पुण्याच्या एका कंपनीबरोबर मिळून सुरू केली होती. तेव्हापासून जनतेला हा वाहनतळ आहे असे माहिती आहे.

Ulhasnagar Smart Parking
Ramesh Mhatre Disqualification | रमेश म्हात्रेच्या नगरसेवक पदावर अपात्रतेची कारवाई तात्काळ करा

मात्र पालिका आणि ठेकेदाराचे जुळले नाही. त्यामुळे ठेकेदाराने स्मार्ट पार्किंग बंद केली. मात्र त्यानंतर पार्किंगच्या ठिकाणी अन्य व्यक्ती पासून पार्किंग चालवत होता. या व्यक्तीचा पालिकेची कोणताही करार झालेला नाही. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरही वाहन चालकानी रोजच्या सवयीप्रमाणे या ठिकाणी गाड्या पार्क करणे चालूच ठेवले. विशेष बाब म्हणजे स्मार्ट पार्किंगच्या बाजूलाच पालिकेचे रेगुलर पार्किंग हे चालू आहे. स्मार्ट पार्किंग वर फुकतात बाईक पार्क होत असल्याने बाजूच्या ठेकेदाराने वारंवार पालिकेकडे याबाबत तक्रार केली होती. याच अनुषंगाने कारवाई झाल्याची चर्चा शहरात आहे.

कारवाईदरम्यान अनेक वाहन मालक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. जर पार्किंग अवैध असेल, तर त्याच्या चालक किंवा संचालकाविरुद्ध कठोर कारवाई करावी. तेथे वाहने उभी करणाऱ्या नागरिकांनाच दंड करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. याबाबत प्रभाग समिती क्रमांक ३ च्या प्रभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सलोनी निमकर यांनी सांगितले की, या अवैध पार्किंगबाबत महापालिकेला सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने ही संयुक्त कारवाई करण्यात आली असून अवैध पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापूर्वीही या अवैध पार्किंगच्या संचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही अवैध पार्किंगचा व्यवसाय सुरूच असल्याचे निदर्शनास आले.

Ulhasnagar Smart Parking
Uddhav Thackeray Summons - कथित व्हीडिओप्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिदे यांना कोर्टाचे समन्स

अवैध पार्किंगविरोधात कठोर भूमिका घ्यावी

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सलोनी निमकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी आपली वाहने केवळ महापालिकेच्या अधिकृत कंत्राटदारामार्फत चालविण्यात येणाऱ्या पार्किंगमध्येच उभी करावीत, जेणेकरून भविष्यात अश्या प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही. या कारवाईमुळे प्रशासनाने अवैध पार्किंगविरोधात कठोर भूमिका घेतल्याचा संदेश दिला असला, तरी दुसरीकडे वाहन मालकांचे म्हणणे आहे की, अवैध चालवणाऱ्यांवर प्रभावी कारवाई न करता केवळ वाहनधारकांवर दंड आकारणे योग्य नाही. पालिकेने स्मार्ट पार्किंग बंद केली असेल तर तिला चारी बाजूने कुंपण करून बंद करावे अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news