Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये प्रेम संबंधातून दोन गटांमध्ये रक्तरंजित राडा; पाच जणांना अटक

चाकू हल्ल्यात तरुणाची प्रकृती चिंताजनक
Ulhasnagar knife attack
उल्हासनगरमध्ये प्रेम संबंधातून दोन गटांमध्ये रक्तरंजित राडा; पाच जणांना अटकpudhari photo
Published on
Updated on

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प पाच मधील नेताजी चौकात दोन गटांमध्ये झालेल्या भीषण राड्यात एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गणेश वाघे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना प्रेम संबंधातून झाली असून याप्रकरणी पाच जणांना हिललाईन पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी चार जण हे अल्पवयीन आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादामुळे दोन गटांमध्ये संघर्ष झाला. शुभम वाघे आणि साळवे यांच्यातील वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांना नेताजी चौकात येण्याचे आव्हान दिले. त्यानुसार दोन्ही गट संध्याकाळी चौकात आले असता त्यांच्यात जोरदार झटापट झाली.

Ulhasnagar knife attack
Illegal Firecracker Factory Blast: अवैध फटाका उद्योगात स्फोट; 2 ठार

यावेळी गणेश वाघे याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. जखमी गणेश वाघे याच्यावर प्रथम शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्याला कलवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी शुभम वाघे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश बेंडकुळे, पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर तसेच पोलीस अंमलदार किरण सोनवणे, अरविंद पवार, प्रशांत पाटील, तुषार गावडे आणि सुभाष घाडगे यांच्या पथकाने विशेष कामगिरी बजावत पंकज प्रजापतीसह पाचही आरोपींना अटक केली आहे.

Ulhasnagar knife attack
Nashik news | लाच नाकारल्याने पोलिसांनी लष्कराचे साहित्य असलेला ट्रक पेटवला? येवल्यात खळबळ

यापैकी चार आरोपी अल्पवयीन असून त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पंकज प्रजापती याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news