Ulhasnagar municipal corporation : उल्हासनगर महापालिकेतील सभापतीपदांच्या निवडी बिनविरोध

विविध पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल, स्थायीसाठी सोहता यांचा अर्ज
Ulhasnagar political consensus
उल्हासनगर महापालिकेतील सभापतीपदांच्या निवडी बिनविरोधpudhari photo
Published on
Updated on

उल्हासनगर :उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती तसेच नऊ विशेष समितींच्या सभापती पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने सर्व पदांची निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या विविध समित्यांसाठी बुधवारी सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना नगरसेवक कलवन सिंग सोहता यांनी अर्ज दाखल केला. तसेच सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदासाठी साई पक्षाच्या दीप्ती दुधानी, नियोजन व विकास समिती सभापती पदासाठी भाजपच्या मीना कोर अजित सिंग लबाना, पाणी पुरवठा व जलनिसारण समिती सभापती पदासाठी भाजपच्या दीपा नारायण पंजाबी यांनी अर्ज दाखल केले.

Ulhasnagar political consensus
Sangli News : सभापती निवड बिनविरोध; भाजपाची माघार

आर्रोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या सविता तोरणे, माध्यमिक व पूर्व प्राथमिक शिक्षण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या साक्षी सुर्वे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती पदासाठी भाजपच्या विपुल मयेकर, क्रीडा, समाजकल्याण व सांस्कृतिक समिती सभापती पदासाठी भाजपच्या प्रीती विनोद मखिजा, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या मीना दीपक सोंडे, तर महसूल समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या प्रेरणा अजित मखिजानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

Ulhasnagar political consensus
Dharashiv News : ईश्वरी चिठ्ठीचीही महायुतीला साथ कळंबमध्ये दोन्ही पदांवर संधी

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, गटनेता अरुण अशान, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, उपमहापौर अमर लुंड, मनोहर खेमचंदानी, शेरी लुंड, जमनू पुरस्वानी आदी मान्यवर उपस्थित होते. बिनविरोध निवडीमुळे महापालिकेच्या कारभारात स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तीन महिन्यांनी निवडीला मुहूर्त

16 जानेवारी रोजी उल्हासनगर महापालिका निवडणुकीचा निकाल लागला असला तरी अद्याप येथील विषय समित्यांसह स्थायी समितीच्या सभापतींची निवडणूक संपन्न झाली नव्हती. अखेर तीन महिन्यांनंतर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने 20 एप्रिल रोजी स्थायी समितीच्या सभापतीसह विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक जाहीर केली.उल्हासनगर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया 16 जानेवारी रोजी निकालानंतर संपन्न झाली. त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी येथे महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शिंदेची शिवसेना, भाजप यांनी विरूद्ध निवडणूक लढून एकत्र सत्ता स्थापन केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news