Mumbra Train Accident | केतन सरोजचा लोकलचा प्रवास ठरला अखेरचा! दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू

उल्हासनगरच्या हनुमान नगर परिसरात शोककळा
Ulhasnagar  Ketan Saroj Death
केतन सरोज (Pudhari Photo)
Published on
Updated on

Ulhasnagar Ketan Saroj Death Diva Mumbra Local Train Accident

उल्हासनगर : सोमवार, सकाळची वेळ... आठवड्याच्या पहिल्याच दिवशी केतनने ठाण्याला कामावर जाण्यासाठी शहाड वरून छत्रपती शिवाजी टर्मिनस - कसारा ही ट्रेन पकडली. त्याचा हा लोकलचा अखेरचा प्रवास ठरला. परंतु याच दरम्यान दिवा-मुंब्रा रेल्वे मार्गावर घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात केतन दिलीप सरोज या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण हनुमान नगर परिसराला सुन्न करणारी ठरली आहे.

केतन सरोज (वय अंदाजे 22) हा सकाळी 8.29 वाजता शहाड स्थानकावरून निघाला होता. तो ठाण्याच्या आशार आय टी पार्क येथील एका कंपनीत काम करीत होता आणि रोजच्या प्रमाणे त्यांनी सीएसएमटी-कसारा लोकल पकडली होती. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान बाजूच्या ट्रॅक वरून जाणाऱ्या जलद लोकलमधील एका प्रवाशाची बॅग दरवाज्यात लटकत असलेल्या केतन आणि इतर आठ प्रवाश्यांना लागली. त्यामुळे तोल जाऊन केतन हा रेल्वे रुळावर पडला. केतन बरोबर त्याच परिसरात राहणारा मित्र दीपक शिरसाट हा देखील त्याच डब्यात प्रवास करीत होता.

Ulhasnagar  Ketan Saroj Death
ठाणे : रेल्वे रुळांवर रील बनवणार्‍या विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली?

दीपक शिरसाटने सांगितले की, केतन पडल्यावर दोन ते तीन वेळा अपघातावेळी लोकल थांबविण्यासाठी खेचवायची चैन खेचली. मात्र, ट्रेन थेट ठाण्याला जाऊन थांबली. दीपकने स्लो लोकलने प्रवास करत मुंब्रा गाठले. रेल्वे रूळांवर पडलेल्या केतनला तत्काळ रुग्णवाहिकेने छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले.

केतनने प्रीती अॅकॅडमी महाविद्यालयातून बी.कॉम. पदवी घेतली होती. त्याचे वडील दिलीप सरोज वायरमन म्हणून काम करतात. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असून केतन हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावत होता. त्यांची आई घर सांभाळायची. दिलीप सरोज यांना एकूण तीन मुले असून केतन हा सर्वात मोठा होता. अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण हनुमान नगर परिसरावर शोककळा पसरली आहे. केतन यांचे बालपण याच परिसरात गेले.

Ulhasnagar  Ketan Saroj Death
Thane News : ठाणे-बोरीवली बोगद्याला जोड रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news