ठाणे : रेल्वे रुळांवर रील बनवणार्‍या विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली?

रेल्वे पोलीस दलातील 3 कर्मचार्‍यांची बदली
रेल्वे रुळ
रेल्वे रुळfile photo
Published on
Updated on

बोईसर : रेल्वे रुळालगत रील बनवणार्‍या विद्यार्थ्यांकडून अवैधपणे पैशांची वसुली करणार्‍या रेल्वे पोलीस दलातील तीन कर्मचार्‍यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात येऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.

सोमवारी (दि.2) बोईसरच्या अवधनगर परिसरातील 16 ते 18 वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थी बोईसर स्थानकाजवळील रेल्वे रुळालगत मोबाईलमधून रील बनवत होते. यावेळी बोईसर रेल्वे स्थानकात कार्यरत रेल्वे पोलीस दलातील देवेंद्र कुमार, अरविंद सिंग आणि देवेंदर सिंग या तीन कर्मचार्‍यांनी रील बनवणार्‍या तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन रुळालगत विनापरवानगी रील बनवण्याचे कारण देत कारवाई करायची नसेल तर पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र विद्यार्थ्यांकडे इतके पैसे नसल्याने त्यांना जवळपास तीन ते चार तास थांबवून ठेवले होते.

अखेर रेल्वे पोलीस कर्मचार्‍यांना अडीच हजार रुपये दिल्यानंतर विद्यार्थ्यांची सुटका केली. यातील एका विद्यार्थ्याने पैसे देतानाची चित्रफित मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली होती. विद्यार्थ्यांकडून रेल्वे पोलिसांनी पैसे घेतानाची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली. या प्रकरणाची रेल्वे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल घेत तिन्ही कर्मचार्‍यांची बदली केली असून चौकशीनंतर त्यांच्यावर आवश्यक कारवाई केली जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news