

Ulhasnagar theft case
उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प ५ मधील एका किराणा दुकानात घुसून ५३ हजार रुपये रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोघांना हिललाइन पोलिसांनी अटक केली आहे. चोराकडून 22 हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
उल्हासनगर कॅम्प पाच मधील सह्याद्री नगर येथील पवन रमेशलाल बजाज यांच्या मालकीच्या 'रमेश स्टोअर्स' मध्ये ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. त्यावेळी पवन यांचे वडील दुकानात एकटे होते. त्याच दरम्यान एक युवक अॅक्टिवा स्कूटरवर दुकानासमोर आला आणि काही वस्तू मागू लागला. मात्र तो गाडीवरून खाली न उतरता दुकानदारानेच बाहेर येऊन सामान द्यावे, असे सांगू लागला. त्याचे कारण म्हणजे गाडी बंद होईल अशी त्याची बतावणी होती.
हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अविनाश सुर्वे, पोलिस कर्मचारी संदीप बर्वे, जयेश गुरव, प्रदीप खरमाळे, सलीम इमानदार त्यांनी तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या दोन्ही तरुणांची ओळख पटवली.
त्या आधारे साहिल कुकरेजा आणि आकाश गोगिया या दोघांना ताब्यात घेतले आहे. साहिल कुकरेजावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.