

ठाणे : येत्या बुधवारी १२ ऑगस्ट रोजी आषाढ अमावास्येच्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण, तसेच शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे; परंतु तेही भारतातून दिसणार नसल्याची माहिती खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना सोमण म्हणाले की, बुधवार १२ ऑगस्टच्या सूर्यग्र-हणाची खग्रास स्थिती ग्रीनलॅन्ड, आईसलॅन्ड, रशिया, स्पेन, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क आणि फ्रान्स देशातील काही भागात दिसणार आहे.
या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती २ मिनिटे १८ सेकंद दिसेल. हे सूर्यग्रहण रात्री ९ वाजून ४ मिनिटांनी ते उत्तररात्री १ वाजून २८ मिनिटांच्या कालावधीत दिसणार आहे.
भारतातून दिसणारे खंडग्रास सूर्यग्रहण हे पुढीलवर्षी २ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे. शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी ते दुपारी १२ वाजून ३२ मिनिटे या वेळेत होणारे खंडग्रास चंद्रग्रहण हे भारतातून दिसणार नाही. हे चंद्रग्रहण अमेरिका, आफ्रिका आणि युरोपचा काही भाग येथून दिसणार असल्याचे सांगितले.