TMC News | कचरा कोंडी ! शहरातील घंटागाडी रिकामी करण्यास परवानगी नाही, कोणाचे आदेश?

Thane Garbage Problem : कंत्राटदार घंटागाडी रीकाम्या करण्याच्या प्रतिक्षेत; सर्वत्र दुर्गंधी, आरोग्य धोक्यात
ठाणे
ठाणे महानगरपालिकेच्या डंपिंग हद्दीच्या बाहेरील कोणत्याही भागात ठाणे शहरातील कचरा व्हॅन रिकामी करण्यास परवानगी नसल्याने कचरा विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. (छाया : अनिशा शिंदे)
Published on
Updated on

ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क | शिवसेना खासदार नरेश म्हस्के डम्पिंग ग्राउंडवरून आक्रमक झाले असून ते अधिकाऱ्यांवर संतापलेले पाहायला मिळाले. त्यांच्या आदेशावरुन कचऱ्याने भरलेल्या घंटागाडी रिकाम्या करण्यात आलेल्या नसल्याने कचराकाेंडी झालेली पहावयास मिळत आहे.

ठाणे वागळे इस्टेटमधील ठाणे महानगरपालिका डंपिंग ग्राउंडमध्ये शुक्रवारी (दि.7) रोजी लागलेल्या आगीनंतर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आक्रमक पवित्रा घेत नरेश म्हस्के डम्पिंग ग्राउंडवरून आक्रमक झाले. ही आजची परिस्थिती नाही, नेहमीची स्थिती आहे, काही मर्यादा आहेत ना? अहो काय तुम्ही करता रुममध्ये बसून? असाही संताप त्यांनी व्यक्त डंपिंग ग्राउंडकडे एकही गाडी येऊन द्यायची नाही असे आदेशच काढले.

ठाणे
रविवारी (दि.9) रोजी सकाळपासून टीएमसी कचरा कंत्राटी कामगार हे कचरा भरलेल्या घंटागाडी रीकाम्या होण्यासाठी वाट पाहत आहेत. (छाया : अनिशा शिंदे)

या आदेशामुळे शनिवारी (दि.8) रोजी कचऱ्याने भरलेल्या कचरा व्हॅन रिकामे करण्यात आल्या नाहीत. ठाणे महानगरपालिकेच्या डंपिंग हद्दीच्या बाहेरील कोणत्याही भागात ठाणे शहरातील कचरा व्हॅन रिकामी करण्यास परवानगी मिळालेली नाही. रविवारी (दि.9) सकाळी ठाणे महानगरपालिका कचरा कंत्राटी कामगार कचरा भरलेल्या व्हॅन रीकाम्या करण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे शहरातील कचराकोंडीचा प्रश्न वारंवार डोके वर काढत आहे. शहरभर दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news