डोंबिवली : तीन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश; महात्मा फुले पोलिसांची कारवाई

डोंबिवली : तीन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश; महात्मा फुले पोलिसांची कारवाई

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : चिकणघर येथे असणाऱ्या मोरया स्वीट अँड ड्रायफ्रुटच्या दुकानाचे शटर फोडून दुकानातील ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरणाऱ्या तिघांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या संशयीत आरोपींकडून ८ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.

मोहम्मद करीम उर्फ लाडो अख्तर अली बागवान (रा. खेमाणी उल्हासनगर), साकीर जाकीर खान (वय २०, रा. म्हारळगाव ), शिवम महेंद्र बतमा उर्फ मच्छी (वय २०, जावसईगाव, अंबरनाथ प.) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, चिकणघर येथे मोरया स्वीट आणि ड्रायफ्रूटचे दुकान आहे. या दुकानात गुरुवारी (दि.१७) रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चोरी करून ३२ हजार २०० रुपयाच्या मुद्देमाल लंपास करण्यास आला. त्यानंतर या घटनेची तक्रार दुकान मालकाने महात्मा फुले पोलीस ठण्यात नोंदवली. यानंतर सीसीटिव्ही माध्यमातून पोलिसांनी तीन संशयीत आरोपींना शोधून काढले आहे.

दरम्यान संशयीत आरोपी मोहमद करीम यांच्याकडून ७ हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून त्याचा साथीदार साकीर जाकीर खान हा निष्पन्न झाले. यानंतर साकीरचा शोध घेवून त्याचेकडून ५ हजार रोख रक्कमसह गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तर तिसरा साथीदार शिवम याच्याकडून ८ लाख रुपयाचे सोन्या- चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

तिघांवर बदलापूर पोलीस स्टेशन, अंबरनाथ पोलीस स्टेशन, मध्यवर्ती पोलीस स्टेशन, महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन , विक्रोळी पोलीस स्टेशन येथे अनेक गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, कल्याण विभगाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news