शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांना धमकीचे पत्र

पार्सलमधून पत्रासोबत बंदुकीची गोळी पाठवली
विकास रेपाळे यांना धमकीचे पत्र
विकास रेपाळे यांना धमकीचे पत्रPudhari Photo
Published on
Updated on

ठाणे : शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांना जीवे ठार मरण्याचे धमकीचे पत्र आले आहे. अज्ञात व्यक्तीकडून रेपाळे यांच्या राहत्या घरी पार्सलमधून हे पत्र आले असून विशेष म्हणजे या पत्रासोबत त्यांना एक बंधूकीची गोळी देखील पाठवण्यात आली आहे. आता फक्त हातात गोळी दिली आहे, पुढच्या वेळी डोक्यात गोळी टाकेन अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. रेपाळे यांनी यासंदर्भात वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून केलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास रेपाळे यांना धमकीचे पत्र
नागरिकांनो सावधान! सायबर चोरटे पाठवत आहेत ‘अटकेची नोटीस’, धमकी आल्यास पोलिसांशी संपर्क साधा

वागळे स्टेट परिसरातील काशीश पार्क येथील अटलांटिस सोसायटीत शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे राहतात. त्यांच्या राहत्या घरी 30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास तीन पार्सल आले होते. हे पार्सल विकास यांच्या आईने स्वीकारले होते. त्यांच्या आईने हे पार्सल 1 ऑक्टोबर रोजी विकास यांच्या ऑफिसमध्ये पाठवून दिले होते. हे पार्सल विकास रेपाळे यांनी उघडून बघितले असता एका पार्सल मध्ये शार्पनरचा एक बॉक्स होता. त्यात कागदात सेलोटेपने चिटकवलेली बंदुकीची गोळी आढळून आली. सोबतच एक चिठ्ठी देखील मिळून आली असून या चिठ्ठीत 'इस बार हात मे दे रहा हु, अगली बार खोपडी मे डाल दुगा' अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी विकास रेपाळे यांनी वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

विकास रेपाळे यांना धमकीचे पत्र
Pudhari News | मंत्रि‍पदासाठी धमकी, शिवसेनेतच पेटली ठिणगी

वागळे पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास रेपाळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांचे निकटवर्तीय मानले जातात. एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकाला धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news