Beating wife by husband for domestic reasons
घरगुती कारणावरून पतीकडून पत्नीला मारहाणFile Photo

कल्याण : आवडता स्वयंपाक नाही केला म्हणून पतीने पत्नीच्या डोक्यात घातली कढई

हल्लेखोर पतीच्या विरोधात गुन्हा दाखल
Published on

कल्याणमध्ये आवडीचा स्वयंपाक न केल्यामुळे नवऱ्याने बायकोला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संतप्त पतीने बायकोच्या डोक्यामध्ये कढई मारली. ही घटना मंगळवारी (दि.13) घडली. या प्रकरणी युसुफ मेवेगार याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला आहे. निलोफर युसुफ मेवेगार (वय.34) असे जखमी पत्नीचे नाव आहे. निलोफर आणि युसुफ हे दाम्पत्य कल्याण पश्चिमेकडील मुरबाड रोडला असलेल्या सिंधीगेट भागातील कुरबान हुसेन चाळीत राहतात.

Beating wife by husband for domestic reasons
नवऱ्याने बायकोला ATM कार्ड आणि जॉईंट सेव्हिंग खाते दिले पाहिजे - सर्वोच्च न्यायालय

चविष्ट जेवण का बनवत नाहीस या कारणावरुन युसुफ नेहमी पत्नी निलोफर सोबत भांडत होता. मंगळवारी केलेले जेवण न आवडल्यामुळे त्याने तिच्यासोबत शाब्दिक वाद काढत रागाच्या भरात स्वयंपाकघरातून आणलेली कढई पत्नी निलोफरच्या डोक्यात आदळली. फटका वर्मी बसल्याने निलोफर गंभीर जखमी झाली. तशाच अवस्थेत तिने तात्काळ महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जाऊन पती युसुफचा प्रताप सांगितला. पोलिसांनी जखमी निलोफरवर केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचार करवून घेतले. त्यानंतर तिच्या जबानीवरून हल्लेखोर युसुफच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी हवालदार के. पी. शिंदे अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news