Bhiwandi News : सर्वात मोठ्या बकरी बाजारावर मंदीचे सावट

कोनगाव तरीपाडा बाजारात बकऱ्यांची आवक वाढली मात्र हवातसा बाजारभाव नाही
Bhiwandi News
Bhiwandi News : सर्वात मोठ्या बकरी बाजारावर मंदीचे सावटFile Photo
Published on
Updated on

The biggest goat market faces recession

भिवंडी : सुमित घरत

बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी खास बकरा हवा असतो, बकरी ईद म्हणजे ईद उल अधा हा त्यागाचा सण म्हणून येत्या ७ जून रोजी मुस्लिम धर्मीय बांधव मोठ्या उत्सवात साजरा करत असतात. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बकरी बाजारात पावसामुळ बकरे खरेदी कमी प्रमाणात होत असल्याच दिसून आले. तर काही पर राज्यातील बकरा व्यापारी आणि बकरी ईद निमित्तानं कुर्बानीसाठी बकरा घेणारे ग्राहक यांच्याशी वार्तालाब केली असता महागाईमुळं बाजार मंदीचं सावट असल्यानं यंदाचा बाजार नरम गरम असल्याचं सांगण्यात आलं.

Bhiwandi News
Old Mumbai-Pune Highway : जुना मुंबई-पुणे महामार्ग यंदा जाणार पाण्याखाली

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बकरी बाजार भिवंडी तालुक्यातील कोनगाव तरीपाडा भागात आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आठवड्यातून तीन दिवस बारामाही बकरी बाजार भरतो. त्यातच दरवर्षी बकरी ईद निमित्तानं हा बाजार महिनापासून सुरू आहे. या बकरी बाजारात संपूर्ण जिल्ह्यात सुप्रसिद्ध असून मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवसात भरणाऱ्या या बकरी बाजारात यंदा बकरी ईद निमित्तानं बकरे विक्रीसाठी गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातून मोठ्या संख्येने व्यापारी आले आहेत. मात्र गेल्या २० दिवसापासून खूपच कमी प्रमाणात बकरे विक्री झाल्याची खंत एका बकरा व्यापाऱ्याने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

बकरी ईद सणाला कुर्बानीसाठी पांढरा शुभ्र बकऱ्याला अधिक मागणी असल्यानं हे बकरे २५ हजारापासून ते ९० हजारपर्यत विक्री केली जाते. मुस्लिम बांधव हे बकरे महाग असूनही खरेदी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे पर राज्यातील बकरे कोनगाव बकरी बाजार उघड्यावरच बांधून ठेवत असल्यानं पर राज्यातील बकरे पावसामुळं आजारी पडत असल्याचे व्यापारी सांगत आहे.

Bhiwandi News
Thane News : नारिवली बोगद्यातील तलाव अखेर होणार बंद

विशेष म्हणजे पर राज्यातील व्यापारी ट्रक- टेम्पोने हजारो किलोमीटरचा प्रवास करून या बकरी बाजारात बकरे आणले जातात. परंतु प्रवासाचे भाडेही अजूनही वसूल झाले नसल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.

पावसाने बाजार कमी

दिवसात भरणाऱ्या या बकरी बाजारात बकरे विक्रीसाठी गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातून मोठ्या संख्येने व्यापारी येत असतात. तर दुसऱ्या दिवशीच्या मटण विक्रीसाठी अनेक खरेदीदार मटण विक्रेते खाटीक या ठिकाणी बकरे खरेदीसाठी येत असतात. मार्च ते मे महिन्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लग्न सराई होती. या लग्न सराईत हळदी सभारंभात मटणाची जेवणावळी असते. त्यामुळं या दिवसातही बकऱ्यांच्या किंमती १० ते ३० हजारापर्यत खरेदी विक्री होत असते. मात्र यंदाच्या बकरी ईद सणावर पावसाचं सावट असल्यानं बकरे व्यापारी चिंता व्यक्त करताना दिसत आहे.

66 जोधपुर, राजस्थान येथून बकरे विक्रीसाठी बाजारात आणले आहेत. परंतु पावसामुळे खरेदीदारांची संख्या कमी झाली आहे. आणि बकरे उघड्यावर बांधल्याने पावसाने बकऱ्यांची तब्येत खालावत असल्याने बोकड विक्री करताना भावही कमी मिळत आहे. त्यामुळे यावेळी आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
- सद्दाम शेख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news