Menstrual Hygiene Education: मासिक पाळीमुळे होणारी विद्यार्थी गळती रोखणार; जिल्हा परिषद शाळांमध्ये उभारणार पिंक रूम

अर्थसंकल्पात विशेष तरतूद
Menstrual Hygiene Education: मासिक पाळीमुळे होणारी विद्यार्थी गळती रोखणार; जिल्हा परिषद शाळांमध्ये उभारणार पिंक रूम
Published on
Updated on

श्रद्धा कांदळकर

ठाणे: ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीशी संबंधित अडचणींमुळे शिक्षण खंडित होण्याचे गंभीर वास्तव लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलींसाठी ‌‘पिंक रूम‌’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या उपक्रमासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पाच शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या खोल्या उभारल्या जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी दिली.

Menstrual Hygiene Education: मासिक पाळीमुळे होणारी विद्यार्थी गळती रोखणार; जिल्हा परिषद शाळांमध्ये उभारणार पिंक रूम
Dombivli Reel Star Arrest: रीलस्टारच्या घरातून 7 पिस्तुले, 370 जिवंत काडतुसे जप्त; चपलांच्या स्टॅन्डमध्ये होता गुप्त कप्पा

किशोरवयात मुलींमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांची प्रक्रिया सुरू होते. या संवेदनशील काळात स्वच्छता, गोपनीयता आणि आत्मसन्मान जपण्यासाठी सुरक्षित जागेची गरज असते. मात्र ग्रामीण भागात या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने अनेक मुलींना मासिक पाळीदरम्यान शाळा टाळावी लागते, तर काही वेळा त्यांचे शिक्षण कायमचे थांबते.

युनिसेफच्या सर्वेक्षणानुसार देशभरात दरवर्षी सुमारे 23 लाख मुली मासिक पाळीशी संबंधित अडचणींमुळे शाळा सोडतात, तर तब्बल 71 टक्के मुलींना पहिली पाळी येईपर्यंत त्याविषयी कोणतीही माहिती नसते. सामाजिक गैरसमज, स्वच्छतेबाबत अज्ञान, सुविधा अभाव आणि आर्थिक मर्यादा या समस्यांना अधिक तीव्र करतात.

या पार्श्वभूमीवर ‌‘पिंक रूम‌’ हा उपक्रम केवळ सुविधा नसून शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हस्तक्षेप मानला जात आहे. मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन बदलणे, विश्रांती घेणे आणि स्वतःची स्वच्छता राखणे यासाठी मुलींना शाळेतच सुरक्षित व स्वतंत्र जागा उपलब्ध होणार आहे.

साधारणपणे 15 बाय 20 फूट आकाराची वर्गखोली ‌‘पिंक रूम‌’ म्हणून विकसित केली जाणार असून, प्रत्येक शाळेसाठी सुमारे 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.या उपक्रमामुळे मुलींची शाळेतील उपस्थिती वाढण्यास आणि शिक्षणात सातत्य राखण्यास मदत होणार आहे.

Menstrual Hygiene Education: मासिक पाळीमुळे होणारी विद्यार्थी गळती रोखणार; जिल्हा परिषद शाळांमध्ये उभारणार पिंक रूम
KDMC News | कामावरून काढण्याची धमकी: महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी; 'केडीएमसी'तील अधिकाऱ्याची चौकशी

कशी असेल ‌‘पिंक रूम‌’?

शाळांमध्ये उभारण्यात येणारी ‌‘पिंक रूम‌’ ही साधारण 15 बाय 20 फूट आकाराची स्वतंत्र व सुरक्षित जागा असेल. ही खोली मुलींच्या गोपनीयतेचा पूर्ण विचार करून तयार केली जाणार असून या रूममध्ये आरामासाठी बेड, खुर्ची-टेबल, आरसा आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असेल.

मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन तसेच वापरलेल्या नॅपकिनसाठी डिस्पोजल मशीनची सोय असेल. स्वच्छतागृह, डस्टबिन, पंखे व दिवे यांचाही समावेश असेल. याशिवाय मुलींमध्ये जागरूकता वाढावी यासाठी टीव्ही, पुस्तके आणि मासिके ठेवण्यात येणार आहेत. क्रीडा, योग व पीटी तासांदरम्यान कपडे बदलण्यासाठीही या रूमचा उपयोग होणार आहे.

मासिक पाळी ठरते शिक्षणात अडथळा

देशात आजही मासिक पाळीविषयी अनेक गैरसमज आणि सामाजिक बंधने आहेत. स्वच्छतेच्या सुविधा नसणे, सॅनिटरी पॅड्सचा अभाव आणि माहितीची कमतरता यामुळे दरवर्षी लाखो मुली शिक्षणापासून दूर जात आहेत.

ग्रामीण भागात ही समस्या अधिक गंभीर आहे. स्वच्छ पाणी, शौचालयांची कमतरता, सामाजिक दबाव आणि ‌‘पाळी‌’विषयी बोलण्याची भीती यामुळे मुलींना दर महिन्याला शाळा टाळावी लागते. अनेक वेळा हीच अनुपस्थिती पुढे कायमस्वरूपी गळतीत रूपांतरित होते. त्यामुळे ‌‘पिंक रूम‌’सारखे उपक्रम मुलींच्या शिक्षणासाठी अत्यावश्यक पाऊल ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

“मासिक पाळी सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनींचे शिक्षण थांबते. ‌‘पिंक रूम‌’मुळे मुलींमध्ये आणि पालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. यामुळे विद्यार्थी गळती रोखण्यास मदत होईल, तसेच मुलींच्या उपस्थितीत वाढ होऊन त्यांच्या शिक्षणात सातत्य राहील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.”

बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news