Thane ZP PF System: मोबाईलवरच पीएफ खात्याची माहिती; ठाणे जिल्हा परिषदेची अद्ययावत डिजिटल प्रणाली

या प्रणालीचा लाभ जिल्हा परिषद अंतर्गत 3 हजार 461 कर्मचारी घेत आहेत.
Thane ZP PF System
Thane ZP PF SystemPudhari Photo
Published on
Updated on

ठाणे: जिल्हा परिषद ठाणेच्या अर्थ विभागाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणारी संगणकीकृत प्रणाली अधिक अद्ययावत केली असून ती आता पूर्णपणे मोबाईल फ्रेंडली करण्यात आली आहे.

या वेब बेस्ड प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्याची माहिती मोबाईल ॲपद्वारे सहज पाहता येणार असून, वर्गणी जमा होणे, व्याज गणना, वार्षिक लेखे तयार करणे आदी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान झाल्या आहेत. या प्रणालीचा लाभ जिल्हा परिषद अंतर्गत 3 हजार 461 कर्मचारी घेत आहेत.

Thane ZP PF System
Vasai Virar Dog Shelter: वसईमध्ये एक हजार श्वानांच्या क्षमतेचे निवारा केंद्र उभारणार; वसई-विरार महापालिकेचा निर्णय

जिल्हा परिषद ठाणेच्या अर्थ विभागामार्फत सन 2009-10 पासून सर्व्हर बेस्ड प्रणालीद्वारे पीएफ लेखे तयार करण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर सन 2018-19 पासून ही प्रणाली वेब बेस्ड करण्यात आली. आता सन 2025-26 मध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून प्रणाली अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांना सन 2020-21 ते 2025-26 या कालावधीतील पीएफ लेखे मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापूर्वी छापील विवरणपत्रे देण्यात येत होती; मात्र आता डिजिटल स्वरूपात माहिती आणि प्रिंट मिळणे शक्य झाले आहे.

प्राथमिक शिक्षकांसाठीही ही प्रणाली अधिक सुलभ करण्यात आली आहे. शालार्थ प्रणालीमधील अनुसूची थेट इम्पोर्ट करून शिक्षकांच्या झऋ खात्यात दरमहा वर्गणी जमा करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

तसेच पंचायत समिती आणि मुख्यालय स्तरावरील कर्मचारी अनुसूचीनुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट वर्गणी जमा करू शकतात. वर्गणी जमा झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना एसएमएसद्वारे तत्काळ माहिती दिली जाते. त्यामुळे व्यवहारातील पारदर्शकता वाढली असून कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Thane ZP PF System
Pre Monsoon Preparation: वसई-विरारमध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग! महापौरांकडून पाहणी

‌‘जिल्हा परिषद प्रशासनामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कर्मचारी सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यावर भर देण्यात येत आहे. भविष्य निर्वाह निधीची अद्ययावत वेब बेस्ड प्रणाली ही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असून, मोबाईल फ्रेंडली सुविधेमुळे कर्मचारी कोणत्याही वेळी आपल्या खात्याची माहिती सहज तपासू शकतात,‌’ असे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेकडील पीएफ संबंधी संपूर्ण माहिती क्लाउड सर्व्हरवर सुरक्षित ठेवण्यात आली असून डेटा सुरक्षेसाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आल्याचेही अर्थ विभागाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news