Thane ZP bribery case : जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक

20 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
Thane ZP bribery case
Thane ZP bribery casepudhari photo
Published on
Updated on

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यास 20 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

शंकर आरे (44, कनिष्ठ प्रशासन अधिकारी) आणि श्रीकांत खंडागळे (56, सहाय्यक प्रशासन अधिकारी) अशी दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. जिल्हा परिषदेतील एका सेवानिवृत्त शिक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून ठाणे एसीबीने ही कारवाई केली.

Thane ZP bribery case
Pune ACB Bribery Arrest: जिल्हा व्यवस्थापक व सहायक लेखा अधिकाऱ्याला लाच प्रकरणात अटक

या घटनेतील तक्रारदार हे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या विरोधात सुरू असलेली विभागीय चौकशी बंद करण्यासाठी तसेच सेवानिवृत्ती अंशदान व उपदान काढून देण्यासाठी शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी आरे आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी खंडागळे यांनी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

त्यापैकी 20 हजार शिल्लक रकमेची दोघांकडून वारंवार मागणी होत होती. त्यानंतर तक्ररादार यांनी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात 21 एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने केलेल्या पडताळणीत दोघा अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार 22 एप्रिल रोजी ठाणे जिल्हा परिषद कार्यालय परिसरात सापळा लावून एसीबी पथकाने आरे यांना 20 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.

Thane ZP bribery case
bribe case | 30 हजारांची लाच, घरातील झाडाझडतीत हाती लागलं 4 कोटीचं घबाड ; कपाटात, बॅगेत नोटांचे बंडल!

अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणे एसीबी पथक करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news