राज्याच्या विकासासाठी काम करा, खासदार राजन विचारेंचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला

ठाणे
ठाणे

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : आज माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता ४ वेळा नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार झाला. आज अनेकांचे स्वप्न साकार झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बाकीच्या गोष्टींमध्ये राजकारणात लक्ष न घालता प्रत्येक वर्गाला कसा न्याय दिला जाईल याकडे लक्ष घालावे, असा सल्ला शिवसेना नेते, खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

ठाण्यातील आणि महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रश्न आहेत त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले तर सर्वसामान्य जनतेला याचा निश्चित फायदा होईल, असा विश्वासही खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे. तसेच शिंदे सरकारच्या दहिहांडीबाबतच्या निर्णयावर राजन विचारे यांनी शिंदे सरकारचे आभार मानले आहेत.

राज्य सरकारने गोविंदांबाबत घेतलेला निर्णय चांगला आहे. ठाण्यात गोविंदाला चालना देण्याचे काम आनंद दिघे यांनी केले. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहीहंडीच्या उत्सवाचे रूपांतर महोत्सवामध्ये झाले आहे. या दहीहंडीला राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवण्याचे काम त्यावेळी आनंद दिघे यांनी त्यावेळी केले होते, असेही ते या वेळी बोलताना म्हणाले.

महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या बाहेर देखील दहिहांडी उत्सवाचे त्यावेळी प्रक्षेपण होत होते. खऱ्या अर्थाने गोविंदा पथक निष्ठा, विश्वास, आणि हिंदुत्व या सर्व गोष्टींचा मिलाप झालेला पाहायला मिळत असल्याचे राजन विचारे यांनी सांगितले. आनंद दिघे यांची प्रत्येक कार्यकर्त्यां प्रती चांगली भावना होती.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news