ठाणे : घरातील प्लास्टर कोसळून महिलेचा मृत्यू

ठाणे : घरातील प्लास्टर कोसळून महिलेचा मृत्यू

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : कळव्यातील विटावा परिसरात प्लास्टर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२) रात्री उशिरा घडली आहे. प्लास्टर कोसळलेली इमारत २३ वर्षे जुनी असून इमारतीतील घराच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून या महिलेचा मृत्यू झाला. तर पडझडीत एका वृद्धेलाही दुखापत झाली आहे. बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत प्लास्टर हटवले. या इमारतीला जागोजागी तडे गेले असून इमारत धोकादायक अस्वस्थेत आहे.

दुसऱ्या घटनेत राबोडीतील जुम्मा मज्जिदजवळ तीन मजली शेरदिल अपार्टमेंट या इमारतीच्या तळ मजल्यावरील स्लॅब गुरुवारी दुपारी कोसळल्याची घटना घडली आहे. ही इमारत देखील २० वर्ष जुनी असून इमारत धोकादायक स्थितीत असल्याने इमारत रिकामी करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमुळे शहरातील धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विटावा येथील सूर्यानगर भागात असलेल्या भवानी चौकात साईनगर चाळ असून चाळीची एक मजली इमारत आहे. या चाळीतील नवनाथ गोळे यांच्या घरात लीलावती कुंजू या भाड्याने राहतात. त्यांच्या घराच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले. यामध्ये चंद्रिका जनार्दन (३३) यांचा मृत्यू झाला. तर लीलावती (६५) यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी , बिट निरीक्षक व कळवा प्रभाग समितीचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी जखमींना रुग्णलयात दाखल केले.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news