Mahayuti victory in Thane: आठ प्रभाग समित्यांवर महायुतीचे वर्चस्व

मुंब्रा प्रभाग समितीच्या निवडणुकीत अनुपस्थित राहिल्याने एमआयएमच्या सहर शेख पुन्हा चर्चेत
Mahayuti victory in Thane
Mahayuti victory in ThanePudhari
Published on
Updated on

ठाणे: ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच आठ प्रभाग समित्यांवर महायुतीने वर्चस्व मिळवले आहे. सात प्रभाग समित्यांवर शिवसेना तर एका प्रभाग समितीवर भाजपचा अध्यक्ष निवडून आला आहे.

तर दुसरीकडे सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या सहर शेख या निवडणूक झाल्यानंतर सभागृहात आल्या. त्यामुळे एमआयएमचे उमेदवार नफीजा अन्सारी यांना पाचऐवजी केवळ चारच मते मिळाली तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपाली भगत यांना १० मते मिळून त्या विजयी झाल्या.

Mahayuti victory in Thane
Matheran Viral Reels Controversy: सोशल मीडियावरुन माथेरानची बदनामी; स्थानिकांमधून तीव्र संताप

तब्बल पाच वर्षांनी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून या ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसला. तर उपमहापौरपदी भाजपची वर्णी लागली असून इतर महत्वाची पदेही संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतली आहेत.

स्थायी समिती सदस्य आणि सभापतीची निवडणूक अद्याप झाली नसून त्यापूर्वी प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. ठाणे महापालिकेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव हे उपस्थित होते. नऊ प्रभाग प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदाकारिता शिवसेनेच्या मीनल संखे, वागळे प्रभाग समितीसाठी एकता भोईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीकरिता निर्मला कणसे, कळवा प्रभाग समितीसाठी विजया लासे, दिवा प्रभाग समितीसाठी दीपक जाधव, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीसाठी सिद्धार्थ ओवळेकर आणि वर्तकनगर प्रभाग समितीसाठी जयश्री डेव्हिड या शिवसेनेच्या उमेदवारानी अर्ज दखल केला होता, तर उथळसर प्रभाग समितीकरिता भाजपचे नारायण पवार यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दखल केला होता.

Mahayuti victory in Thane
Panvel lake news: शास्त्रीय उपायांनंतरही वडाळे सरोवर जलपर्णीच्या विळख्यात

ठामपच्या सात प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे संख्याबळ असल्याने या प्रभाग समितीमध्ये अन्य कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दखल केला नाही, त्यामुळे मंगळवारी झालेल्या निवडणुकीत या सातही प्रभाग समित्यांवर शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर उथळसर प्रभाग समितीमध्ये भाजपचे सर्वाधिक सदस्य असल्याने या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे नारायण पवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.

पालिका वर्तुळात चर्चा

दुसरीकडे मुंब्रा प्रभाग समितीकरिता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दीपाली भगत व एमआयएमच्या नफिसा अन्सारी यांच्यात सामना होणार होता. मुंब्रा प्रभाग समितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सर्वाधिक १० सदस्य आहेत, तर एमआयएमकडे ५ सदस्यांचे संख्याबळ होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दीपाली भगत यांचाही विजय निश्चित मानला जात होता.

मात्र मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 'कैसे हराया' या वाक्याने सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या एमआयएम च्या नगरसेविका सहर शेख अनुपस्थित राहिल्या. निवडणूक प्रक्रियेनंतर त्या सभागृहात आल्या.

त्यामुळे मुंब्रा प्रभाग समितीच्या निवडणुकीत दीपाली भगत यांना त्यांच्या सदस्यांची १० मते तर एमआयएमच्या नफीज अन्सारी यांना सहर शेख अनुपस्थित राहिल्याने पाचऐवजी केवळ चारच मते पडली. सहर शेख या निवडणुकीत का अनुपस्थित राहिल्या याबाबत मात्र पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news