Matheran Viral Reels Controversy: सोशल मीडियावरुन माथेरानची बदनामी; स्थानिकांमधून तीव्र संताप

स्थानांचीही चुकीची माहिती
Matheran Viral Reels Controversy
Matheran Viral Reels ControversyPudhari
Published on
Updated on

मिलिंद कदम

माथेरान: माथेरानमध्ये पावसाला सुरुवात होतात सोशल मीडियावर अनेक रिल्सचा पाऊस सुरू झाला, आपली पोस्ट सर्वाहून कशी वेगळी याकरता चढाओढ सुरू झाली. यातूनच माथेरानच्या बदनामीचेही व्हिडिओ समोर येऊ लागले आहे.

ज्यामध्ये चुकीच्या पॉईंटची नावे येथील महागाई बाबत चुकीच्या बातम्या व कहर म्हणजे गणपती विसर्जन घाटास चक्क गरम पाण्याचे कुंड म्हणून व्हायरल. करण्यात आले. त्यामुळे या चुकीच्या माहितींमुळे माथेरान ची बदनामी सुरू झाली आहे. या विरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Matheran Viral Reels Controversy
Panvel lake news: शास्त्रीय उपायांनंतरही वडाळे सरोवर जलपर्णीच्या विळख्यात

एक महिन्यापूर्वी एका युट्युबरने माथेरानमध्ये पाण्याची बाटली दीडशे रुपयाला विकली जात असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर सदर महाशयाने सर्वांचे माफी मागत चुकीने असा व्हिडिओ झाला असे सांगून व्हिडिओ पाठवला होता.

सध्या येथील गणपती विसर्जन घाटावरचा एक नवीन व्हिडिओ युट्युब वरती आलेला असून या जागेला गरम पाण्याचे कुंड म्हणून दाखविण्यात आले आहे. ही जागा हे वॉकर टँक या नावाने प्रसिद्ध असून ब्रिटिशांनी ही बनवली आहे.

Matheran Viral Reels Controversy
Raigad Rain Alert: रायगडला आज ऑरेंज अलर्ट

कालांतराने येथे गणपती विसर्जन करण्यात येऊ लागले व या ठिकाणाचा आकार गोल बादली सारखा असल्याने या बादली या नावानेच सर्व ओळखतात.या चुकीच्या माथेरान मधून या युट्यूबरशी अनेकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

प्रसिद्धीसाठी फसवणूक

अनेक युट्युबर प्रसिद्धीसाठी माथेरान मधील फसवणुकीच्या किंवा विविध प्रेक्षणीय स्थळांच्या पोस्ट करीत असतात प्रेक्षणीय स्थळांची नावे ही यामध्ये चुकीची व माहिती चुकीची असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे त्यामुळे अशा लोकांवर कायमस्वरूपी वचक असावा याकरिता स्थानिकांनी अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे ठरविले आहे.

माथेरान हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांसाठी एक सुंदर पर्यटन स्थळ आहे,येथील स्थानिक नागरिक पर्यटकांना योग्य व खरी माहिती देत असतात परंतु येथे बाहेरून आलेली मंडळी थोड्याशा फायद्यासाठी पर्यटकांना चुकीची माहिती देऊन फसवत असतात त्यामुळे पर्यटकांनी सावध राहून स्थानिक नागरिकांकडून खात्री करावी.

- भास्कर शिंदे हॉटेल व्यवसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news