ठळक मुद्दे
ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये तरुणाईचा उत्साह उसळला
तू धाव, घे क्षितिजाचा ठाव असं म्हणत तब्बल 25 हजार स्पर्धक धावले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला
ठाणे : तब्बल सहा वर्षांनी पार पडलेल्या ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये रविवारी (दि.10) रोजी पाचपाखाडी येथील महापालिका चौकात तरुणाईचा उत्साह उसळला होता. तू धाव, घे क्षितिजाचा ठाव असं म्हणत तब्बल 25 हजार स्पर्धक या स्पर्धेत उत्साहात धावले. 21 कि.मी या मुख्य स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या धर्मेंद्र तर महिला गटात रविना गायकवाड यांनी अव्वल स्थान पटकावले.
धर्मेंद्र याने 1 तास 7 मिनिटे आणि 41 सेकंदात 21 किमीचे अंतर पार केले. तर रविना गायकवाड यांनी 1 तास 25 मिनिटे आणि 46 सेकंदात शर्यत पूर्ण केली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी स्पर्धेला झेंडा दाखवला.दरम्यान केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही खेळाडूंना नेहमीच पाठबळ दिले असल्याचे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 31 व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 21 किमीस्पर्धेत पुरुष स्पर्धकांना झेंडा दाखवला. तर त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी 21 किमीच्या महिलांच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर टप्प्याटप्याने एकूण 12 गटातील स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे शिंदे यांनी अभिनंदन केले. ठाणे वर्षा मॅरेथॉनचे नाव देशभरात घेऊन जाण्याचे काम सर्व खेळाडूंनी केले. दादोजी कोंडदेव स्टेडियम अद्ययावत स्टेडियम झाले असून आतापर्यंत 23 कोटी मिळाले आहेत. खेळासाठी पैसे कमी पडणार नाही, असे आश्वासन यावेळी शिंदे यांनी केले.
यावेळी वर्षा मॅरेथॉनचे प्रणेते सतीश प्रधान यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. आमची सर्वांची इच्छा आहे ठाण्याचा खेळाडू ऑलिम्पिक मध्ये गेला पाहिजे. मोदी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळाडूना प्रोत्साहन देण्याचे काम केलं.
ग्रामीण भागातून आदिवासी पाड्यातून येणारी मूल चपळ असतात त्यांना प्लॅटफॉर्म हवा असतो तो देण्याचं काम केलं आहे. मला आठवतं अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलं, त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्यांना बक्षीस दिल्याचे प्रतिपादन यावेळी शिंदे यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सगळयांनी याप्रसंगी, घरोघरी तिरंगा अभियानाच्या निमित्ताने मॅरेथॉनच्या व्यासपीठावर तिरंगा प्रतिज्ञा घेतली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांनी स्पर्धेत सहभागी होऊन ठाणे पालिका मुख्यालय ते पाचपाखाडी येथील साईबाबा मंदिरापर्यंत धावले. शिंदे यांना धावताना पाहून स्पर्धकांमध्ये अनोखा उत्साह निर्माण झाला होता. धावत असताना शिंदे यांच्या सोबत ठामपा आयुक्त सौरभ राव ,खासदार नरेश म्हस्के सोबत होते, कोणताही थकवा न येता मोठ्या उत्साहाने शिंदे यांनी मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला अन स्पर्धकांची तसेच स्पर्धक लाडक्या बहिणींची मने जिकली.
ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विविध 12 गटात झाली. विजेत्यांना एकूण 10 लाख 38 हजार 900 रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणार्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली. 21 कि.मी स्पर्धेतील विजेत्यास एक लाखांचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सगळयांनी याप्रसंगी, घरोघरी तिरंगा अभियानाच्या निमित्ताने मॅरेथॉनच्या व्यासपीठावर तिरंगा प्रतिज्ञा घेतली.
ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. देवाती बेन्नी असे मृत्यू झालेल्या स्पर्धकाचे नाव आहे.स्पर्धेत धावून घरी आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ठाण्यातील हॅपी वॅली परिसरात राहणारे देवाती बेन्नी हे दरवर्षी वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत होते. विशेष म्हणजे ते दररोज व्यायाम शाळेतही जात होते. वर्षा मॅरेथॉनसाठी त्यांनी विशेष मेहनतही घेतली होती. ठाणे महापालिकेने आयोजित केलेल्या 31 व्या वर्षा मॅरेथॉन मध्ये 21 किमी स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा आटपून ज्यावेळी ते घरी आले त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवाती बेन्नी यांच्या मृत्यूमुळे ठाण्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पुरुष खुला गट - अंतर 21 किमी
1. धर्मेंद्र, एसएसआय, पुणे
2. अंकुश हक्के, सांगली
3. कमलाकर देशमुख, नाशिक
4. बेलिअप्पा एपी, पुणे
5. सचिन यादव, मुंबई उपनगर
6. राज तिवारी, मुंबई
7. इश्वर झिरवाल, नाशिक
8. धुलदेव घागरे, सांगली
9. अमोल अमुने, सोलापूर
10. सिद्धेश बर्जे, रत्नागिरी
महिला खुला गट - अंतर 21 किमी
1. रविना गायकवाड, नाशिक
2. आरती पवार, नाशिक
3. साक्षी जड्याल, रत्नागिरी
4. ऐश्वर्या खलाडकर, पुणे
5. रुक्मिणी भोरे, पालघर
6. अभिलाषा मोडेकर, पुणे
7. प्रियांका पैकाराव, ठाणे
8. प्रतिक्षा चोरमले, मुंबई
9. आंचल मारवा, मुंबई
10. उर्मिला बने, मुंबई
पुरुष, 18 वर्षावरील, 10 किमी
1. चैतन्य रुपनेर, सांगली
2. अतुल बरडे, नाशिक
3. वैभव शिंदे, नाशिक
4. आशुतोष यादव, मुंबई
5. प्रतिक डांगरे, पालघर
6. मन्नू सिंग, ठाणे
7. हितेश शिंदे, मुंबई
8. हर्षा चौहान, मुंबई
9. दत्ता आढाव, परभणी
10. सूरज झोरे, सातारा
महिला, 16 वर्षावरील, 10 किमी
1. साक्षी भंडारी, अहिल्यानगर
2. मानसी यादव, पुणे
3. रिनकी पवार, नाशिक
4. शेवंता पवार, धुळे
5. आरती भगत, नागपूर
6. मोनिका सिंग, मुंबई
7. प्रियांका कुपते
8. आदिती पाटील, ठाणे
9. प्रियांका देवरे, नाशिक
10. जयश्री कुंजरा, पालघर
मुले, 18 वर्षाखालील, 10 किमी
1. रोहित संगा
2. विवेक शाह
3. ओंकार सावंत
4. आदित्य यादव
5. कृष्णा जाधव
6. आशिष गौतम
7. अनुप प्रजापती
8. विघ्नेश पाटील
9. दुर्वेश पाटील
10. निशू शर्मा