

Jacky Alamchandani Knife Attack
उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प 2 मधील ढोलूराम मंदिर परिसरात एका सराईत गुंडावर चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हा वाद कारने कट मारल्यामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे.
उल्हासनगर कॅम्प 1 मध्ये जॅकी आलमचंदानी राहत आहेत. ते ढोलूराम दरबार येथून त्यांच्या बर्गमन मोटरसायकलने दुपारी साडे चार वाजताच्या सुमारास जात होते. त्यावेळी समोरून एका कारमधून दोन सरदार आले. त्यांनी जॅकीच्या मोटर सायकलला कट मारल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. या वादाचे पुनर्वसन हातापाईत झाले.
एका सरदारने त्याच्या जवळील धारदार शस्त्राने जॅकी वर हल्ला केला. या हल्ल्यात पोटावर आणि पाटीवर वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या जॅकीला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले आहे. उपचार नंतर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड, पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.