ठाणे : मच्छीमारी नौका बुडून दोन खलाशांचा मृत्यू

Fishing Boat Sinking : वेंगुर्ले-निवती समुद्रात बोट पलटी होवून दुर्घटना
वेंगुर्ले-निवती समुद्रात बोट पलटी होवून दुर्घटना
वेंगुर्ले-निवती समुद्रात बोट पलटी होवून दुर्घटना pudhari news network
Published on
Updated on

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील निवती समुद्रात मासेमारी करून येणारी मच्छीमारी बोट पलटी होऊन या दुर्घटनेत दोन मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना शुक्रवारी (दि. 4) मध्यरात्री 1.45 वा. च्या सुमारास घडली. आनंद पुंडलिक पराडकर (52, रा. कोचरा श्रीरामवाडी) आणि रघुनाथ धर्माजी येरागी (49, रा. खवणे मधलीवाडी) अशी या दुर्घटनेत बुडून मयत झालेल्यांची नावे आहेत. या घटनेबाबत निवती पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

शुक्रवारी (दि. 4) रात्री 8.30 वा. निवती येथील मच्छीमार अनिता आनंद धुरी यांची ‘धनलक्ष्मी’ ही मच्छीमारी बोट 14 खलाशांना घेऊन समुद्रात मच्छीमारसाठी गेली होते. मध्यरात्री निवती समुद्रातून ही बोट परतीचा प्रवास करत असताना ती पलटी झाली. यावेळी मच्छीमारीसाठी वापरली जाणारी गिलनेट जाळी दोघांच्या अंगावर पडल्याने त्यात गुरफटुन त्यांचा जागीच मृत्यू झाला. किनार्‍यापासून जवळच असलेल्या म्हणजेच ज्या ठिकाणीं समुद्र आणि खाडी एकत्र येते त्या ठिकाणी किनार्‍यापासून 200 मीटर अंतर असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने 12 खलाशी पोहून किनार्‍यावर आले.

वेंगुर्ले-निवती समुद्रात बोट पलटी होवून दुर्घटना
मच्छीमार व्यावसायिकांच्या समस्या सोडवणार

या घटनेची माहिती मिळताच निवती मेढा सरपंच अवधूत रेगे, उपसरपंच गोविंद जाधव, ग्रा. पं.सदस्य प्रज्योत मेतर, नागेश सारंग, माजी उपसरपंच अजित खवणेकर व अन्य ग्रामस्थांनी मदतकार्यात भाग घेतला. तसेच निवती पोलिस स्थानकाचे एपीआय सागर खंडागळे, पीएसआय शेट्ये, हवालदार किनलेकर, कांदळगावकर, गावडे हे घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात बुडालेल्या दोघांना बाहेर काढून पंचनामा केल्यानंतर परुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर शनिवारी (दि.5) दुपारी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची खबर पुंडलिक आनंद पराडकर व मोहन अच्युत ताम्हणकर यांनी निवती पोलिस स्थानकात दिली आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्यू नोंद झाली असून अधिक तपास पोलिस हवालदार भांगरे हे करीत आहेत.

निवती परिसरात या घडलेल्या दुर्घटनेमुळे निवती व खवणे भागात शोककळा पसरली आहे. बुडालेल्या दोन्ही खलाशांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. शासनस्तरावरून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य करणे आवश्यक आहे. आनंद पराडकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, मुलगी असा परिवार व रघुनाथ येरागी यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे. निवतीत घडलेल्या या दुर्घटनेमुळे निवती गाव तसेच तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही मच्छींमार बांधवांना ना. दीपक केसरकर यांच्याकडून शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी तातडीची प्रत्येकी 10 हजार रूपयांची आर्थिक मदत हॉस्पिटलमंध्ये सुपूर्द केली. तसेच दोन्ही रूग्णवाहिकेची सर्व आर्थिक जबाबदारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांनी स्वीकारली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news