Thane traffic congestion issue : वाहतूककोंडीमुळे 150 उमेदवारांची परीक्षा हुकली

केडीएमसीच्या नोकरभरतीतील प्रकार, परीक्षा देण्यासाठी पुन्हा संधीची विनवणी
Thane traffic congestion issue
वाहतूककोंडीमुळे 150 उमेदवारांची परीक्षा हुकली (File Photo)
Published on
Updated on

कल्याण : केडीएमसी नोकर भरतीची परीक्षा देण्यासाठी मंगळवारी आलले परीक्षार्थी वाहतूक कोंडीत अडकल्याने केंद्रावर जाण्यास उशीर झाला. त्यामुळे सुमारे 150 जणांना परीक्षा देता आली नाही. बुधवारी त्यांनी केडीएमसी मुख्यालयात धाव आपला संताप व्यक्त केला. पुन्हा संधी द्यावी अशी मागणी केली.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध पदांकरीता नोकरी भरतीसाठी मंगळवारी परिक्षा घेण्यात आली. दुसर्‍या सत्रातील दुपारी 1 ते 3 या कालावधीत टायपिस्ट आणि क्लार्क पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी साडे अकरा ते साडे बारच्या आता परीक्षा केंद्रात घेतले जात होत. मात्र वाहतूक कोंडीमुळे अनेक परीक्षार्थी मुंबइतील पवई येथील परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्राच्या आत घेण्यात आले नाही. त्यामुळे त्यांची संधी हुकली आहे. त्यांना परीक्षा देण्यासाठी पुन्हा संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

पूजा चौधरी यांनी सांगितले की, त्या कल्याणमध्ये राहतात. त्यांनी केडीएमसीच्या नोकर भरतीची जाहिर पाहून अर्ज भरला होता. त्यानुसार मंगळवारी पवई येथे परिक्षा होती. त्याठिकाणी पाच मिनीटे उशीर झाला. त्याठिकाणी परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे त्यांना परीक्षा देता आली नाही. परीक्षेपासून वंचित राहिलेल्या परिक्षार्थींनी बुधवारी केडीएमसीच्या कल्याणातील मुख्यालयात धाव घेत आपला संताप व्यक्त करीत नगरी सुविधा केंद्रात फेर परीक्षा घेण्या करिता पालिका आयुक्तांना निवेदन दिले.

Thane traffic congestion issue
Shinde group BJP conflict : निवडणुकीपूर्वीच शिंदे गट - भाजपमध्ये वाद

दरम्यान, केडीएमसीमध्ये शासनाच्या अनुचित जमाती कल्याण समितीच्या शिष्टमंडळाची दौरा असल्याने या शिष्टमंडळाच्या सरबराई साठी आयुक्तांसह, अतिरिक्त आयुक्त,उपायुक्ताची लगबग सुरू असल्याने परीक्षेपासून वंचित राहिलेल्या परीक्षार्थींना त्याची भेट मिळू न शकल्याने संध्याकाळी उशिरापर्यंत पालिका आयुक्ताची भेट होईल आश्वासन मिळेल या आशेवर वंचित परीक्षार्थी ताटकळत उभे होते.

फक्त 1 मिनिट उशीर झाला...

मयुर राठोड यांनी सांगितले की, वाहतूक कोंडीमुळे परिक्षा केंद्रावर वेळेवर पोहचता आले नाही. परिक्षा केंद्रावर पोहचण्यास फक्त 1 मिनिट उशिर झाला. तरी त्यांनी परिक्षा केंद्राच्या आत घेतले नाही. त्यामुळे परिक्षा देता आलेली नाही. आमच्या भवितव्याचा प्रश्न आहे.

पवईऐवजी कल्याणमध्ये केंद्र हवे

दिव्या सपकाळ यांनी सांगितले की, केडीएमसीच्या नोकर भरतीची परिक्षा होती. मात्र त्यासाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर, कर्जत, उल्हासनगर, खोपोली भागातून उमेदवार आले होते. त्यांच्याकरीता परिक्षा केंद्र पवईला इतक्या लांब न ठेवता कल्याण या मध्यवर्ती शहरात ठेवणे गरजेचे होते. वाहतूक कोंडीमुळे जवळपास 150 जण परिक्षा केंद्रावर पोहचू शकले नाही. त्यांना परिक्षा केंद्रात शिरु दिले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news