Shinde group BJP conflict : निवडणुकीपूर्वीच शिंदे गट - भाजपमध्ये वाद

कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या वॉर्ड रचनेला भाजपचा आक्षेप; 22 सप्टेंबरला सुनावणी
Shinde group BJP conflict
Shivsena Vs BJPfile photo
Published on
Updated on

मुंबई : कुळगाव बदलापूर नगरपरिषद निवडणुकीपूर्वीच शिंदे गट व भाजपमध्ये वाद उफाळून आला असून हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. शिंदेंच्या नगरविकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या मसुदा वॉर्ड रचनेच्या अधिसूचनेला भाजपच्या आजी- माजी नगरसेवकांनी आक्षेप घेत वॉर्डाची रचना मनमानी व राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी संपूर्ण प्रक्रिया अवैध ठरवण्याची मागणी केली आहे. याचिकेवर आज न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली न्यायालयाने त्यावर 22 सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित केली.

कुळगाव बदलापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी वॉर्ड सीमांकनाबाबत अधिसूचना जारी करण्यात आली असून 18 ऑगस्ट रोजी नगरपरिषदेने वॉर्ड रचनेबाबत मसुदा तयार झाला. बदललेल्या वॉर्ड रचनेमुळे विशिष्ट उमेदवारांना फायदा होणार आहे तसेच सीमांकन करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक किरण भोईर यांच्यासह सात जणांच्या वतीने अ‍ॅड. अजिंक्य गायकवाड यांनी याचिका दाखल केली आहे.

Shinde group BJP conflict
Mumbai housing projects: मुंबईत पुनर्विकासाच्या माध्यमातून उभारणार 44 हजार 277 नवी घरे, एकूण किंमत 941 अब्ज रुपये

निवडणूक कायद्यानुसार डिलिमिटेशन प्रक्रिया गुप्त ठेवणे बंधनकारक असताना, मसुदा नकाशे अधिकृत अधिसूचना येण्यापूर्वीच काही खास लोकांपर्यंत पोहोचवले गेले. वॉर्ड रचना राजकीय हेतूंनी व विशिष्ट उमेदवारांना सोयीस्कर होईल अशा पद्धतीने केली गेली असा आरोप करत याप्रकरणी नगरसेवकांनी दाद मागितली आहे. या याचिकेवर आज बुधवारी न्या. रवींद्र घुगे व न्या. अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. न्यायालयाने याची दाखल घेत याचिकेची सुनावणी 22 सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित केली.

याचिकेतील मुद्दे

  • वॉर्ड क्र. 19 ची रचना सरळ व समांतर न ठेवता अमिबा आकारात आखली गेली आहे. त्यामुळे त्या वॉर्डचा विकास आणि प्रशासन करणे कठीण होईल.

  • वॉर्डची रचना सरळ, सुसंगत व एकत्रित करण्यात यावी.

  • काही सीमारेषा नाल्याच्या पलीकडे काढल्या आहेत, जिथे रस्त्यांचा अभाव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news