Thane Tobacco De-addiction: नोंदणी 73 हजारांची; व्यसनमुक्ती 1588; तंबाखू मुक्ती केवळ नावापूरतीच

व्यसन रोखण्यात यंत्रणेसमोर मोठे आव्हान
Thane Tobacco De-addiction
Thane Tobacco De-addictionPudhari
Published on
Updated on

ठाणे: तंबाखूजन्य पदार्थांच्या वाढत्या सेवनामुळे तरुणाईसह सर्वच वयोगटातील नागरिक गंभीर आजारांच्या विळख्यात अडकत असताना, ठाणे जिल्ह्यातील तंबाखू मुक्ती मोहिमेची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू मुक्ती केंद्रात एप्रिल 2012 पासून आजतागायत तब्बल 73 हजार 777 नागरिकांनी नोंदणी केली; मात्र त्यापैकी केवळ 1588 जणांनी प्रत्यक्षात तंबाखूचे व्यसन सोडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जनजागृती, समुपदेशन आणि कारवाईनंतरही तंबाखूचे व्यसन रोखण्यात यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Thane Tobacco De-addiction
Panvel Online Betting Racket: ऑनलाईन सट्टेबाजांवर धडक कारवाई; 13 जणांना अटक

ठाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मावा, जर्दा, बिडी आणि पानमसाला यांसारख्या पदार्थांच्या वाढत्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयरोग आणि पक्षाघातासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने जनजागृतीवर भर दिला आहे.

विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढती व्यसनाधीनता ही चिंतेची बाब मानली जात आहे. स्पर्धात्मक जीवनशैली, तणाव, संगत आणि स्टाइल स्टेटमेंटच्या नावाखाली युवक तंबाखूकडे वळत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा रंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तंबाखू सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगासह अनेक जीवघेण्या आजारांचा धोका वाढत आहे. तंबाखू मुक्ती केंद्रामध्ये समुपदेशनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असली, तरी प्रत्यक्ष व्यसनमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.

Thane Tobacco De-addiction
Konkan MLC Election: कोकण विधान परिषदेसाठी जुईल दळवी-जुवेकर यांचा अर्ज

तंबाखूजन्य पदार्थांविरोधातील मोहिमेत नागरिक, पालक, शिक्षक आणि समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय जनजागृती मोहीम, शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, महिला बचत गटांचे मार्गदर्शन, शाळा तंबाखूमुक्त अभियान, पथनाट्य, रॅली, पोस्टर प्रदर्शन आणि समुपदेशन शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

कोटपा कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि तंबाखू विक्रीविरोधात कारवाई करण्यात येत असून, आतापर्यंत 9 हजार 133 व्यक्तींवर कारवाई करून 11 लाख 83 हजार 956 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात 2437 तंबाखूमुक्त शाळांची नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news