Panvel Online Betting Racket: ऑनलाईन सट्टेबाजांवर धडक कारवाई; 13 जणांना अटक

पनवेल पोलिसांकडून 13 जणांना अटक,लाखो रुपये जप्त
Online Betting
Online BettingPudhari
Published on
Updated on

पनवेल: पनवेल तालुका पोलिसांनी ऑनलाईन सट्टेबाजी व जुगार रॅकेटवर मोठी कारवाई करत 13 आरोपींना अटक केली आहे. वाकडी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे 2 लाख 71 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पनवेल तालुका पोलिसांनी ऑनलाईन सट्टेबाजी व जुगार रॅकेटवर मोठी कारवाई करत 13 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 2 लाख 71 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वाकडी परिसरात करण्यात आली.

Online Betting
Kalyan Crime News Update: कल्याणच्या गायत्री हत्येला सैराट वळण

आरोपींनी संगनमत करून भारतात प्रतिबंधित असलेल्या ऑनलाईन गेमिंग ॲप आणि वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना सट्टेबाजीस प्रवृत्त केले. यासाठी विविध व्यक्तींच्या बँक खात्यांची माहिती, पासबुक, एटीएम कार्ड, मोबाईल क्रमांक तसेच इतर कागदपत्रांचा वापर करण्यात येत होता. आरोपी ‌‘लोटस 365‌’ या ॲप अथवा लिंकच्या माध्यमातून क्रिकेटसह विविध खेळांवर ऑनलाईन सट्टा खेळण्याची सुविधा पुरवत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 17 मोबाईल फोन, 6 लॅपटॉप, 4 लॅपटॉप चार्जर, 4 एक्स्टेन्शन बोर्ड, 10 मोबाईल चार्जर, एक वाय-फाय राऊटर, विविध बँक पासबुक, चेकबुक, क्रेडिट व डेबिट कार्ड, सिमकार्ड, पासपोर्ट तसेच व्यवहारांची नोंद असलेल्या डायऱ्या जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2 लाख 71 हजार 630 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Online Betting
Konkan MLC Election: कोकण विधान परिषदेसाठी जुईल दळवी-जुवेकर यांचा अर्ज

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता () कलम 316(2), 318(4), 3(5), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा 1887 मधील कलम 4 व 5 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 43, 66 आणि 66(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दिपाली पाटील (सायबर सेल), सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुरुद्ध गिजे तसेच पनवेल शहर व पनवेल तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. या रॅकेटमागील आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news