ठाणे : तिघांची हत्या करणार्‍या आरोपीच्या पत्नीलाही अटक

खुनाच्या गुन्ह्यात सहभागाचा पोलिसांचा दावा
arrested
अटक file photo
Published on
Updated on

वाडा : तालुक्यातील नेहरोली गावात एकाच कुटूंबातील तिघांची हत्या करून उत्तरप्रदेशात फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला वाडा येथे घेऊन येण्याचे काम पोलिसांनी केले. याच गुन्ह्यातील सहभागी असलेल्या आरोपीच्या पत्नीला देखील उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

arrested
ठाणे : धक्कादायक! प्रियकरासाठी वाट्टेल ते...मुलीकडून आईची हत्या

नेहरोली गावातील बोंद्रेपाडा भागात मुकूंद राठोड, कंचन राठोड व त्यांची मुलगी संगिता या तिघांची आरिफ अन्सारी नावाच्या आरोपीने हत्या केली. वाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरिफला उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथून अटकही केली आहे. तपासा दरम्यान आरोपीची पत्नी सायबा बेगम अन्सारी या गुन्ह्यात सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

आरोपी आरिफ याने घरी जाऊन सायाबाला गुन्ह्याची माहिती देताच तिने हत्येच्या ठिकाणी येऊन रक्ताचा सडा साफ केल्याचे तसेच आरोपीने चोरलेली चांदीची नाणी विकण्यात त्याला मदत केल्याचे समोर आले आहे.

गुन्ह्यात सहभाग असल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला देखील उत्तरप्रदेशातून बेड्या ठोकून गजाआड केले आहे. आरोपी सायाबा हिला न्यायालयात हजर केले असता तिला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वाडा पोलीस निरिक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news